मोदींकडून अदानी ग्रुपच्या व्यवसाय वृद्धी साठी सतत लिफ्ट दिली जात आलीय का?

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योजक गौतम अदानी यांच्या संबंधाबद्दल विरोधकांकडून नेहमीच हल्लाबोल केला जात आहे. मोदी सरकारकडून अदानी ग्रुपच्या व्यवसाय वृद्धी साठी सतत लिफ्ट दिली जाते, तसेच हिंडेनबर्ग रिपोर्ट नंतर अदानी ग्रुपची चौकशी करण्यासाठी मोदी यांनी कोणतेही पाऊल उचलले नाही असे अनेक आरोप केले जातात. हे आरोप खरे आहेत का? असे आरोप का केले जातात? त्यामागची पार्श्वभूमी काय आहे ? याविषयी ध्रुव राठीने एक व्हिडिओ पब्लिश केली आहे (लेखाच्या शेवट दिली आहे)
कोण आहे ध्रुव राठी?
ध्रुव राठी हा एक प्रसिद्ध भारतीय युट्युबर आहे. त्याची युट्युब वर 10 मिलियन पेक्षा जास्त (एक करोड पेक्षा जास्त) फॉलोवर्स संख्या आहे. तो भारतातील हरियाणा राज्यातील असून त्याने पदवीचे शिक्षण मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधून जर्मनी मध्ये पूर्ण केले तर मास्टर्स डिग्रीचे शिक्षण रिन्यूएबल एनर्जी या विषयात पूर्ण केले.
लहानपणापासून व्हिडिओ बनवण्याची आवड असल्याने त्याने या क्षेत्रात काम सुरू केले. आतापर्यंत त्याने ५०० पेक्षा जास्त व्हिडिओ युट्युब चॅनेल वर अपलोड केले असून त्यामध्ये भारतातील व भारताबाहेरील सामाजिक, राजकीय, इतिहास, विविध घोटाळे आदी विषयांवर अभ्यासपूर्ण व्हिडिओ सादर केलेले आहेत.
त्याच्या अनेक व्हिडिओमध्ये मोदी सरकारच्या विविध बाबींवर त्याने बोट ठेवले असल्यामुळे अनेक जण त्याला भाजप विरोधी समजतात.वैयक्तिक त्याची मते जी असतील ती असतील परंतु त्याची प्रत्येक व्हिडिओ ही अभ्यास पूर्ण व विविध पुराव्यासहित सादर केलेली असते. यासाठी त्याची स्वतःची रिसर्च टीम काम करत असते.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे तो भारतातील घटनांवर बोलत असला तरी तो भारतात राहुन काम करत नाही. सुरक्षिततेसाठी त्याने स्वतःची लोकेशन ही कधी जाहीर केलेले नाही.