‘आदिनाथ’ कारखाना सुरु करणेसाठी पुढाकार घेतलेल्या नेत्यांनी स्वतःचा ऊस फक्त ‘आदिनाथ’लाच घालावा – मा.आ.जयवंतराव जगताप
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : श्री.आदिनाथ सह.साखर कारखान्याच्या संचालक मंडळ, बचाव समिती तसेच कारखाना सुरु करणेसाठी पुढाकार घेतलेल्या नेत्यांनी स्वतःचा व आपल्या कुटुंबियांचा संपूर्ण ऊस फक्त आदिनाथ लाच घालावा, ऊसाचे एक टिपरू देखील दुसऱ्या कारखान्याला घालू नये तशा प्रकारे या सर्वांनी श्री.आदिनाथ व कोटलिंग चरणी शपथच घ्यावी असे आवाहन आदिनाथ कारखान्याचे माजी चेअरमन तथा माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी चिखलठाण (ता.करमाळा) येथे जाहीर सभेत बोलताना केले.
श्री.जगताप आदिनाथ चे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत सरडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजीत कार्यक्रमात बोलत होते. यावेळी आमदार संजयमामा शिंदे, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील उपस्थित होते.
पुढे बोलताना श्री.जगताप म्हटले कि, सध्याच्या स्थितीत आदिनाथ सुरु करण्याच्या हालचाली , सातत्याने १५ वर्षे सत्ता असूनही गैरकामकाजामुळे, गैरव्यवस्थापन व भ्रष्टाचारामुळे सलग ३ वर्षे बंद अवस्थेत कारखाना राहिला आहे, घोडे मैदान जवळच आहे, जनतेने योग्य नेत्यांची प्रतवारी करावी तसेच येणाऱ्या सर्व निवडणुका आपण व आ.संजयमामा शिंदे एकत्रच लढविणार असून योग्य उमेदवार देणार असल्याचेही श्री. जगताप यांनी सांगितले.
याप्रसंगी आदिनाथचे माजी अध्यक्ष वामनराव बदे, उद्धवदादा माळी, तानाजी झोळ, महादेव कामटे, दादासाहेब लबडे, श्रेणिक खाटेर , सुजित बागल यांचेसह चिखलठाण व पंचक्रोशीतील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.