करमाळ्यात होणाऱ्या कृषी महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या प्रचार आणि प्रसार करणाऱ्या वाहनांची विधिवत पूजा संपन्न..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : राज्याचे माजी मंत्री लोकनेते दिगंबरराव मामा बागल यांच्या 68 व्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित 9 मार्च ते 13 मार्च 2023 या कृषी महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या प्रचार आणि प्रसार करणाऱ्या वाहनाची विधिवत पूजा करमाळा नगर परिषदेचे नगरसेवक डॉक्टर अविनाश घोलप यांच्या हस्ते करण्यात येऊन, या गाडीला स्वर्गीय मामांचे जुने अनुभवी कार्यकर्ते रामदासजी बाबर व लक्ष्मण नरसाळे,यांनी हिरवा झेंडा दाखवून याचा प्रारंभ केला.
यावेळी मकाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व कृषी महोत्सवाचे स्वागताध्यक्ष दिग्विजय बागल, राज्य सहकारी साखर संघाच्या संचालिका आणि कृषी महोत्सवाच्या मुख्य निमंत्रक रश्मी बागल, विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे , आदिनाथचे चेअरमन धनंजय डोंगरे, मार्केट कमिटीचे सभापती प्राध्यापक शिवाजीराव बंडगर, उपसभापती चिंतामणी दादा जगताप, नगरसेवक शौकत नालबंद, सचिन घोलप, राजश्रीताई माने , प्राचार्य मिलिंद फंड सर, कल्याण राव सरडे, माजी नगरसेवक सुनील बनसोडे, नरारे सर,विजय पवार, श्रीदेवीचा माळ चे माजी सरपंच राजेंद्र फलफले, भाऊसाहेब फुलारी, शिवसेनेचे सोलापूर जिल्हा प्रमुख महेश चिवटे, नासिर कबीर, जयंत दळवी, एल.टी.राख, माजी संचालक दिनेश भांडवलकर,शंभूराजे फरतडे, विजय लावंड, महेश तळेकर, संजय दिवाण, कुमार माने, विजय घोलप, सचिन पिसाळ, बाळू नाना रोडे, बिभिषन खरात, वांगी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन डॉक्टर विजय रोकडे, आदी मान्यवर उपस्थित होते.