प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग (PMFME) योजना अंतर्गत कार्यशाळा
करमाळा / संदेश प्रतिनिधी : प्रा.मनोज म. बोबडे यांच्याकडून..
करमाळा : केन्द्र शासन प्रणित, आत्मनिर्भर भारत अंतर्गत, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना येत्या पाच वर्षांच्या कालावधीत राबविण्यात येणार आहे. शेतमाल प्रक्रिया आणि कृषी पूरक व्यवसाय यांचेसाठी ही योजना आणली आहे. या योजनेत करमाळा तालुक्यातील अधिकाधिक शेतकरी उद्योजकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी करमाळा, संजय वाकडे यांनी केले आहे.
तालुका कृषी अधिकारी कार्यालय, करमाळा यांच्यावतीने लाभार्थी अर्ज सादरीकरण भव्य अशी कार्यशाळ आयोजित केली होती, या कार्यक्रमाला 162 महीला बचतगट ,कृषी विभागातील सर्व अधिकारी वर्ग उपस्थित होते यावेळी ते बोलत होते. योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभार्थी व गट लाभार्थी जसे शेतकरी उत्पादक गट, संस्था, कंपनी, स्वयंसाह्यता गट व उत्पादक सहकारी संस्था यांना लाभ देय आहे. योजनेतून शेतीमालाचे मूल्यवर्धन, पुरवठा साखळींशी जोडणी व त्याद्वारे संबंधितांचे जीवनमान उंचावले जाणार आहे. योजना बँक कर्जाशी निगडित असून, वैयक्तिक लाभार्थ्यांना भांडवली गुंतवणुकीकरिता पात्र प्रकल्प खर्चाच्या ३५ टक्के व कमाल १० लाख मर्यादित व गट लाभार्थ्यांना सामाईक पायाभूत सुविधा व भांडवली गुंतवणुकीसाठी पात्र प्रकल्प खर्चाच्या ३५ टक्के अनुदान देय आहे.
तसेच या महिला मेळावात तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे, देवराव चव्हाण कृषी अधिकार, मनोज म. बोबडे जिल्हा समन्वयक तथा जिल्हा संसाधन व्यक्ती ( PMFME), डी.एस. चौधरी मंडळ कृषी अधिकारी, योगेश जगताप(उमेद), अजय बागल (आत्मा) उमाकांत जाधव, अविनाश शिंदे (केंद्र व्यवस्थापक, मनीवाईज वित्तीय साक्षरता केंद्र, करमाळा) इतर कर्मचारी, उद्योजक शेतकरी उपस्थित होते, यावेळी योजनेतील लाभार्थी चे अर्ज सादरीकरण, त्रुटी पूर्तता, प्रकल्प अहवाल, योजनेचा व्याप्ती यावर चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाचे आभार मनोज बोबडे यांनी मानले. उमेद भवन सभागृह करमाळा येथे पार पडला.
नवीन प्रक्रिया उद्योग उभारल्यास या योजनेतून अनुदान मिळते, ज्वारी व्यतिरिक्त इतर कार्यरत प्रक्रिया उद्योग असेल तर त्याच्या विस्तारीकरण, स्तरवृध्दी,आणि आधुनिकीकरणासाठी अनुदान दिले जाते. वैयक्तिक लाभार्थी ,गट संस्था, सहाय्यता गट ,शेतकरी उत्पादन कंपनी, संस्था उत्पादक ,सहकारी संस्था या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत.” या योजने सबंधी अर्ज करण्या साठी श्री मनोज म.बोबडे
यांच्या शी संपर्क साधावा 9881651012 किंवा कृषी विभाग करमाळा सर्व कर्मचारी यांच्याशी संपर्क साधा. – समाधान खूपसे पाटील प्रशिक्षण समन्वयक (PMFME) राज्य स्तरिय तांत्रिक संस्था कृषी विज्ञान केंद्र, बारामती
▪️पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत एक जिल्हा योजनेअंतर्गत एक जिल्हा एक उत्पादनअंतर्गत जिल्ह्यात ज्वारीजन्य पदार्थाच्या प्रक्रिया उद्योगासाठी बॅंकांकडून भांडवल देण्यात येते.
▪️ मात्र आता योजनेचे निकर्ष बदलेले असल्याने कोणत्याही जिल्ह्यात कोणतेही फळ किंवा अन्नधान्य पदार्थापासून उत्पादने तयार करण्यात येतील त्यासाठी भांडवल मिळणार आहे
▪️ यामध्ये ज्वारीजन्य पदार्थ सागरी उत्पादने नाचणी भगर चिकू, आंबा ,केळी ,कांदा, टोमॅटो, दूध, गहू , द्राक्ष ,गुळ, मका, मोसंबी, सीताफळ, पेरू, हरभरा, तूर, मूग, हळद, मिरची ,संत्रा, सोयाबीन, जवस, भात, आधीचा या प्रक्रिया उद्योगामध्येे सामावेश असल्याचे सांगण्यात आले आहे
▪️▪️ प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत एक जिल्हा एक उत्पादन ही कृषी प्रक्रिया उद्योगाबाबतची एक चांगली योजना आहे.शेतकरी किंवा शेतकरी गट एकत्र येऊन शेतमालावर वर प्रक्रिया करणारा
उद्योग उभारू शकता.त्यातून शेतकऱ्याच्या मालाला चांगला भाव मिळेल .त्यामुळे या योजनेचा युवकांनी व महिलांनी त्या प्रमाणात लाभ घ्यावा
▪️ यामध्ये उद्योगाला 35% सबसिडीची तरतूद कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे
▪️ – मनोज म.बोबडे (जिल्हा समन्वयक तथा जिल्हा संसाधन व्यक्ती)