कर्नाटकच्या युवतीचा दिल्लीच्या दिशेने पायी प्रवास सुरु – पंतप्रधान मोदींची ‘या’ मागण्यांसाठी भेट घेणार

मनामध्ये देशभक्तीचा भाव असणारी कर्नाटक राज्यातील रायचूर जिल्ह्यातील ही तरुण युवती मंजुळा वय २९. हीने गेली १२ दिवसापासून तिच्या मूळ गावापासून दिल्लीच्या दिशेने चक्क पायी यात्रा सुरू केलेली आहे. हातामध्ये डिजिटल बॅनर घेऊन ही युवती रखरखत्या उन्हात पायी चालत मजल दरमजल करत रोज एका गावामध्ये ठराविक अंतरावरती मंदिराच्या ठिकाणी आसरा घेत् दिल्लीच्या दिशेने निघालेली आहे.

या युवतीचे ध्येय एकच आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना भेटणे, देशातला भ्रष्टाचार, लहान चिमुकल्या मुलींवरती होणारा अत्याचार महिलांवरील बलात्कार, बेरोजगारी हे प्रश्न सोडविण्यासाठी चक्क दिल्लीला नरेंद्र मोदी साहेबांची भेट घेण्यासाठी निघालेली आहे. तहान भुकेची तमा न बाळगता रखरखत्या उन्हात ही युवती पायी चालत आहे.तिला देशाच्या पंतप्रधान मोदी साहेबांकडून हीच अपेक्षा आहे की मी दिल्लीत जाऊन त्यांना भेटल्यानंतर देशातील या समस्यांचे निरसन होईल आणि मोदी साहेब यासाठी कठोर कायद्याची अंमलबजावणी करतील. माझ्या अंगात फक्त देशभक्ती सळसळत असून मी माझ्या कुटुंबाचा त्याग करून माझ्या दोन चिमुकल्या मुलींना घरी कुटुंबाच्या ताब्यात देऊन स्वतःच्या जीवाची परवा न करता मी पायी यात्रा करत दिल्लीला निघालेली आहे. कर्नाटक रायचूर ते दिल्ली तबबल 1790 किलोमीटरचा प्रवास आहे.

मांगी(ता.करमाळा) येथून ही युवती जात असताना मी या युवतीशी बातचीत केली. ती म्हणाली की माझ्या डोळ्यासमोर फक्त एकच ध्येय आहे की, मी एवढा हजाराें किलोमीटर चा पायी प्रवास करत दिल्लीला गेल्यानंतर पंतप्रधान मोदी साहेबांची भेट होईल.आणि ते या देशातील भ्रष्टाचारी बलात्कारी यांच्यासाठी माझ्यासमोर कठोर कायदयाची घोषणा करतील. तेव्हाच माझी इच्छा पूर्ण होईल,आणि माझ्या पायी यात्रेला न्याय मिळेल.
खरोखरच 40° 42 डिग्री अंश सेल्सिअस सारख्या तपमान असलेल्या रखरखत्या उन्हात मंजुळा च्या डोक्यावर साधी टोपीही नाही . पोटात अन्न पाणी नाही. दिवसभर जीवावर बेतणारा हा पायी प्रवास करायचा व रात्र झाल्यावर मंदिराच्या ठिकाणी आसरा घेऊन स्वैच्छने कोणी चटणी भाकरी दिली तर त्यावरच पोट भरायचं. बघणाऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणणारा या एकट्या युवतीचा कठीण पायी प्रवास सुरू आहे. या देशभक्त युवतीच्या पायी यात्रेला यश मिळेल. सरकारने या आगळ्यावेगळ्या लढयाकडे जातीने लक्ष देऊन या देशभक्त युवतीच्या पायी यात्रे ला यश मिळवून द्यावे ही जनसामान्याची अपेक्षा आहे.
✍️ प्रवीण अवचर, मांगी ता.करमाळा




