वाढदिवसाचा केक कापला आणि दुर्दैवाने दुसऱ्या दिवशी अंत झाला

करमाळा शहरातील कुंभार वाड्यात राहणारा एक गरीब कुटुंबातला गोंडस बारा वर्षाचा कमलेश (सुतार) क्षीरसागर गेली दोन वर्षापासून रक्ताच्या कॅन्सर आजाराला कडवी झुंज देत होता. कमलेश अत्यंत हुशार चुणचणीत हा मुलगा संपूर्ण गल्लीत तसेच त्याच्या शाळेत सर्वांच्या आवडीचा होता.
कर्करोगाचे निदान झाल्यानंतर त्याने स्वतः आजार कशामुळे होतो, त्याच्यावर उपचार काय, पुढे काय होणार? हे सगळे त्याने युट्युब वरून डॉक्टरांकडून आत्मसात करून घेतले होते. डॉक्टरकडे तपासणीला गेल्यानंतर कर्करोगाबद्दल तो अर्धा अर्धा तास गप्पा मारून प्रश्न डॉक्टरांना विचारत असे. दोन वर्षापासून मी कमलेश सुतारच्या संपर्कात होतो. तो आठवण आली की शिवसेनेच्या ऑफिसमध्ये येऊन गप्पा मारत बसायचा.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा तो प्रचंड फॅन होता. सेनेच्या प्रत्येक कार्यक्रमाला वडिलांना घेऊन येत असे. जवळपास स्वतःचा मृत्यू कधी होणार हे त्याला संपूर्णपणे माहीत होते. पण बोलताना मात्र तो मी मोठा होणार शाळा शिकणार जगणार मरणार नाही असे सांगून तो आई-वडिलांना धीर देत असे. 5 मार्च रोजी तो शिवसेनेच्या ऑफिस मध्ये गप्पा मारण्यासाठी आला होता. त्या दिवशी तो पूर्णपणे थकला होता. शरीरातले अवयव हळूहळू रिकामी होऊ लागले होते सर्व त्याला जाणीव होती
माझ्या 7 मार्च रोजी (शुक्रवारी) वाढदिवसानिमित्त त्याची पूर्ण तब्येत ढासळली होती. त्याला उभा राहता येत नव्हते. पण त्याने वडिलांकडे हट्ट धरला मला वाढदिवसाला जायचे आयोजकांनी सांगितले की आपण सर्वजण त्याच्या घरी जाऊन त्याचा भेटू त्याची तब्येत येण्यायोग्य नाही. त्याने हट्ट धरला शेवटी त्याच्या वडिलांनी त्याला खांद्यावर उचलून वाढदिवसाच्या ठिकाणी आणले. हा सगळा प्रसंग बघून उपस्थित सगळ्यांना गहिवरून आले. मग सर्वांनी बाजूला करून त्याला खुर्ची बसून त्याच्या हस्तेच वाढदिवसाचा केक कापण्यात आला.

त्यानंतर घरी गेल्यानंतर अजून त्याची प्रचंड तब्येत ढासळली डॉक्टरांनी इलाज नाही असे सांगितले. आठ तारखेला सकाळी नऊ वाजल्यापासून ते डोळे बंद केले व सायंकाळी त्यांनी आपला प्राण सोडला. सहा महिन्यांपूर्वी त्याच्यावर शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर आम्ही पत्रकार संघाच्या वतीने त्याचा विश्रामगृह येथे सत्कार करून त्याचा गौरव केला. स्वतःला काय झाले काय आजार आहे आणि पुढे काय होणार आहे याची संपूर्ण कल्पना असताना सुद्धा तो गेली दोन वर्षापासून त्याच्या आई-वडिलांना दोन बहिणींना बारा वर्षाचा मुलगा तोच धीर देत होता.
आठ मार्चला दुपारी दोन वाजल्यानंतर त्याला प्रचंड त्रास चालू झाल्यानंतर डॉक्टर ओंकार उघडे यांनी शासकीय कार्यालयातून आरोग्य खात्याकडून ऑक्सिजन मशीन आणून त्याचा श्वासाचा त्रास कमी केला.आज 9 मार्च रोजी सकाळी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले या अंत्यसंस्काराला सर्वसामान्य जनतेने मोठी गर्दी केली होती.
त्याच्या आई-वडिलांनी जीवाचे रान करून होते तेवढे जवळचे लाखो उपचारासाठी खर्च केले. या दोन वर्षाच्या काळात शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष माध्यमातून दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल पुणे येथे त्याच्यावर सर्व प्रकारचे उपचार करण्यासाठी आर्थिक मदतीसह मानसिक आधार आम्ही दिला होता. मुख्यमंत्री वैद्यकीय निधी मधून सुद्धा भरघोस निधी देण्यात आला. कमलेश यास भावपूर्ण श्रद्धांजली!
✍️ महेश चिवटे, जिल्हाप्रमुख, शिवसेना, करमाळा
संबंधित लेख : अखेर कमलेश गेला!..







Kamalesh Kshirsagar | Cancer | Karmala