दत्तपेठ भागात गटारातील पाणी मिसळून नळाला येत आहे पाणी
समस्या – करमाळा शहरातील दत्तपेठ भागातील नळा द्वारे होत असलेला पाणी पुरवठा अतिशय घाण, गढुळ व गटारातील पाणी मिसळून येत आहे. गेले 15-20 दिवसा पासुन ही समस्या भेडसावत आहे. सदर प्रकरणात आज पर्यंत कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही. ज्यावेळेला गटारी साफ केल्या जात नाहीत त्या वेळी गटारी मध्ये पाणी साठले जाते. पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन गटारीवरून घेतली आहे. यामुळे गटारीतील घाण दुषित पाणी पाईप लाईन मध्ये जाऊन तेच पाणी नळा मार्फत घरोघरी पुरवठा होत आहे. प्रत्येक घरामधे 1-2 तरी व्यक्ती हे घाण पाणी पिल्यामुळे आजारी पडलेले आहेत.
अशा घाण पाण्यामुळे काही दिवसातच गंभीर आजाराला सामोरे जावे लागणार आहे. मुख्याधिकारी साहेबांना लिखीत स्वरुपात अर्ज देखील मी केला आहे. तरी अजून दखल घेतली गेली नाही. या प्रकरणात करमाळा नगरपरिषदेने लक्ष घालून नागरीकांना स्वच्छ पाणी पुरवठा करण्यास मदत करावी ही अपेक्षा! (सोबत व्हिडीओ दिले आहेत)
समस्या सोडविण्याची अपेक्षा कुणाकडून – करमाळा नगरपालिका
समस्या मांडणारे – नंदकिशोर काटकर, करमाळा