शॉर्टकट्सच्या नादात करमाळा आगाराची एसटी गेली चारीत

करमाळा ( संदेश प्रतिनिधी ) : चिखलठाण २ जवळ करमाळा आगारातील एसटी गाडी अरुंद रस्त्यावरून जाताना जवळील चारीत कलंडली. हा प्रकार आज दि.२९ रोजी दुपारी २:३० च्या दरम्यान घडला. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

यात हकीकत अशी की, करमाळ्याहुन चिखलठाण – २ कडे जाणारी गाडी ही नेहमी कुगाव मार्गे जात असते. परंतु आज करमाळा – चिखलठाण – २ (गाडी क्रमांक MH 20 BL 4216) ही गाडी ड्रायव्हरने शॉर्टकट्सने सरडे यांच्या वस्तीच्या रोडने घेतली. रस्ता अरुंद असल्याने सरडे यांच्या वस्तीच्या शेजारील चारीत एसटी कलंडली. गाडीमध्ये कंडक्टर, ड्रायव्हर शिवाय ८-१० पॅसेंजर होते. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेनंतर कुगाव, चिखलठाण – २ च्या ग्रामस्थांनी ही गाडी बाहेर काढण्यासाठी जेसीबी च्या साहाय्याने मदत केली.

In the sound of shortcuts, the ST bus of Karmala depo went to Canol | karmala News | Saptahik Sandesh

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!