करमाळा तालुक्यातील पश्चिम भाग लालपरीच्या प्रतीक्षेत
समस्या – एका बाजूला भारत देश स्वातंत्र्याचा अमृतमोहस्तव साजरा करत असताना, करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील गावे एसटी च्या पायाभूत दळवणाच्या सुविधेपासून वंचित आहेत. करमाळा तालुक्यातील पश्चिम भागात हिंगणी, भगतवाडी, गुलमोहरवाडी, पोमलवाडी, खातगाव गवळवाडी इ. गावांमध्ये अजून महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या एसटीची सुविधा कित्येक वर्षांपासून उपलब्ध नाही , लोकप्रतिनिधी निवडणुकित मत मागण्यासाठी आलिशान गाड्या घेऊन या गावांमध्ये येऊन पोकळ आश्वासने देतात व निवडून आले की गायब होतात, अशी काही परिस्थिती या गावांमध्ये आहे.घटनेच्या अधीन राहून राज्यकर्ते यांनी सर्वाना समान संधी व मूलभूत अधिकार प्रधान करण्याची जबाबदारी पार पडावी लागते. परंतु त्याउलट कामकाज आज करमाळा तालुक्यातील लोकप्रतिनिधींकडून पहावयास मिळत आहे. वास्तविक या भागातील बऱ्याच विद्यार्थ्यांना व जनतेला खाजगी वाहनांच्या साह्याने प्रवास करून आपल्या स्थळी पोहचावे लागत आहे. करमाळा हे तालुक्याचे ठिकाण असल्याने व सर्व प्रकारच्या तालुक्याच्या कामासाठी जनतेला खाजगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. तालुक्याला जाणारी एकतरी एसटी बस या गावांमधून सुरू व्हावी अशी जनतेची मागणी आहे.
समस्या सोडविण्याची अपेक्षा कुणाकडून – करमाळा एसटी बसस्थानक प्रशासन
समस्या मांडणारे – अॅड. नामदेव पाटील , भगतवाडी