करमाळा महावितरण तर्फे कोर्टी, वीट व मांगी येथे विशेष मोहीम आयोजित - Saptahik Sandesh

करमाळा महावितरण तर्फे कोर्टी, वीट व मांगी येथे विशेष मोहीम आयोजित

Mseb karmala

करमाळा ( संदेश प्रतिनिधी) : स्वातंत्र्याची 75 वर्ष झाल्याने अमृतमहोत्सव वर्षानिमित्त करमाळा तालुक्यातील कोर्टी, वीट व मांगी या गावात दिनांक ७ ऑगस्ट ते ९ ऑगस्ट या तीन दिवसात ‘एक गाव एक दिवस’ या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.

या मोहिमेत खालील बाबी केल्या जाणार आहे:
१. विज बिल दुरुस्ती व वसुली
२.नवीन वीज जोडण्या
३. विलासराव देशमुख योजनेअंतर्गत PD To रीकनेक्शन
४. ग्राहकाचे फॉल्टी मीटर बदलणे
५.वीज चोरी पकडणे
६. पडलेली लाईन दुरुस्ती करणे

याच प्रमाणे तालुक्यातील लघु सबस्टेशन मध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. ही मोहीम सुनील पावडे (मुख्य अभियंता-बारामती) यांच्या संकल्पनेतून होत असून करमाळा महावितरणचे संतोष सांगळे(अधीक्षक अभियंता), सुमित जाधव (उपकार्यकारी अभियंता), सुनील पवार(शाखा अभियंता),बार्शी विभागाचे कार्यकारी अभियंता कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे. तरी कोर्टी, वीट व मांगी या गावातील नागरिकांनी या मोहिमेचा लाभ घेऊन सहकार्य करावे असे आवाहन महावितरण च्या अधिकाऱ्यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!