शिवसेना तालुका प्रमुख प्रियांका गायकवाड यांच्या मागणीनंतर करमाळा बसस्थानकात पोलीस यंत्रणा - Saptahik Sandesh

शिवसेना तालुका प्रमुख प्रियांका गायकवाड यांच्या मागणीनंतर करमाळा बसस्थानकात पोलीस यंत्रणा

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : करमाळा बसस्थानकात सध्या चोरीचे व विद्यार्थिनीना छेडण्याचे प्रमाण खूप वाढलेले आहे, त्यामुळे विद्यार्थी, प्रवासी हैराण झालेले असून या भुरटया चोरांमुळे व रोडरोमिओमुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याकरीता करमाळा आगारामध्ये पोलिस नियंत्रण कक्ष स्थापन करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा व त्या मागणीचे

निवेदन करमाळा आगार व्यवस्थापक यांना शिवसेना तालुका प्रमुख प्रियांका गायकवाड यांनी दिले होते, त्याप्रमाणे आगाराच्या व्यवस्थापक अश्विनी किरगत यांनी करमाळा बसस्थानकात पोलिस नियंत्रण कक्षाचे अनावरण केले. याप्रसंगी हा कार्यक्रम शिवसेना जिल्हाप्रमुख आशा टोणपे, सहाय्यक पोलिस निरीक्षक जगदाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
याप्रसंगी आगार प्रमुखांचा, सहायक पोलिस निरीक्षक जगदाळे व निर्भया पथकाचे अधिकारी यांचा सन्मान शिवसेना महिला आघाडी, युवा सेनेच्या वतीने करण्यात आला.

तसेच पुढे बोलताना प्रियांका गायकवाड म्हणाल्या की, आगाराने सदरची मागणी पूर्ण करून विद्यार्थीनी छेडछाडीच्या व चोरीच्या प्रकरणाला आळा घालण्यासाठी मोठी मदत केली आहे. परंतु पोलीस प्रशासनाने सुध्दा पूर्ण वेळ या ठिकाणी सतर्कता ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास ही सुखकर व सुरक्षित वातावरण पार पडेल.

यावेळी युवा सेना जिल्हा उपप्रमुख मयूर यादव, युवा सेना तालुका प्रमुख राहुल कानगुडे, तालुका सम्वयक दादासाहेब तनपुरे, शहर प्रमुख विशाल गायकवाड, उपशहर प्रमुख अविनाश भिसे, प्रसाद निंबाळकर, समीर हलवाई, रेखा परदेशी, भक्ती गायकवाड, सिमरन पठाण, सविता सुरवसे, शिवानी जाधव, कार्तिकी ढोके यांचे सह एस टी डेपोतील बहुसंख्य प्रवासी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!