जेऊर येथील १६ वर्षांची तरुणी बेपत्ता – पळवून नेल्याची तक्रार दाखल
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : जेऊर (ता.करमाळा) येथील हायस्कूलमध्ये इयत्ता १० वीत शिकणारी १६ वर्षांची तरुणी बेपत्ता असून तिला कोणीतरी फूस लावून पळवून नेल्याची तक्रार तरुणीच्या आईने करमाळा पोलिसात दिली आहे.
हा प्रकार काल (ता.५) सकाळी घडला आहे. याप्रकरणी बेपत्ता तरुणीच्या आईने करमाळा पोलिसात फिर्याद दिली असून त्यात त्यांनी म्हटले की, माझी १६ वर्षांची मुलगी ही इयत्तामध्ये 10 वीत जेऊर येथे शिक्षण घेत आहे. ती दररोज सकाळी 08/30 वा. ते 10/30 वा. पर्यंत जादा शैक्षणीक तासाला जात असते.
त्यानंतर घरी येऊन जेवनाचा डबा घेऊन परत तेथेच साधारणपणे सकाळी 11/15 वा.चे सुमारास शाळेत जात असते. त्यानंतर सायं. 05/30 वा.चे सुमारास शाळा सुटल्यानंतर घरी येत असते. परंतु काल (ता.५) माझी मुलगी ही नेहमीप्रमाणे शैक्षणीक तासाला शाळेत जाते असे म्हणून दप्तर घेऊन सकाळी 08/15 वा.चे सुमारास आमचे राहते घरातून जेऊर येथून गेली होती. त्यानंतर महालक्ष्मी सण असल्याने मी हाळदीकुंकूवाचे कार्यक्रमात घराबाहेर होते. माझे पती हे त्यांचे कामास सकाळीच घरातून निघून गेले होते. त्यामुळे मुलगी तिचे शाळेतील शैक्षणीक तास संपवून सकाळी 10/30 वा.चे सुमारास घरी आली आहे किंवा नाही. याची आम्ही खात्री केली नाही.
त्यानंतर सायं. 05/30 वा.चे सुमारास मुलगी ही आद्यापपर्यंत घरी आली नसल्याने मी व माझे पती असे दोघांनी मिळून तिचे वर्गातील जेऊर येथील दोन मैत्रिणींकडे मुलगी आली आहे काय ? याबाबत चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, ती आज शाळेतच आली नाही. त्यामुळे आम्ही आमची मुलगी हिचे वर्ग शिक्षकास फोन लावून खात्री केली असता त्यांनीही मुलगी ही आज रोजी शाळेत आली नाही असे सांगितले.
त्यामुळे आम्ही आमचे जेऊर येथील नातेवाईकांकडे मुलगी ही त्यांचे घरी आली आहे काय किंवा तिचेबाबत काही माहीती आहे काय याबाबत चौकशी केली परंतु मुलीचा काही एक शोध लागला नाही. त्यानंतर आमची खात्री झाली की, आमच्या मुलीला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने तिला कशाचे तरी अमिष दाखवून फुस लावून पळवून नेले आहे. याप्रकरणी करमाळा पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा झाला असून पुढील तपास सुरु आहे.