मोटारसायकलला मालट्रकची धडक - सौरभ शहाणे जखमी - Saptahik Sandesh

मोटारसायकलला मालट्रकची धडक – सौरभ शहाणे जखमी

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : मोटासायकलला पाठीमागून मालट्रकने धडक देऊन झालेल्या अपघातात सौरभ शहाणे हे जखमी झाले आहेत. हा अपघात १ सप्टेंबरला रात्री आठ वाजता करमाळा- जेऊर रस्त्यावर खडकेवाडी गावाच्या जवळील पाण्याच्या टाकीजवळ घडला आहे.

याप्रकरणी सौरभ विकास शहाणे यांनी स्वत: फिर्याद दिली आहे. त्यांनी म्हटले आहे, की एक सप्टेंबरला रात्री आठच्या सुमारास मी मोटारसायकलवरून करमाळ्याकडे येत असताना मालट्रक क्र. एमएच १८ बीजी ८३४२ ने माझ्या मोटारसायकलला पाठीमागून धडक दिली. त्यात मी खाली पडलो व गंभीर जखमी झालो. त्यानंतर रस्त्यावरील लोकांनीच ॲम्ब्युलन्स बोलावून मला नगर येथील साईदिप हॉस्पिटल मध्ये ॲडमीट केले आहे.

सध्या माझी प्रकृती चांगली असल्याचेही त्यात म्हटले आहे. यात डाव्या डोळ्याला जबर दुखापत झाली असून, पोटाला मार लागला आहे व उजवा पाय फॅक्चर झाला आहे. या प्रकरणी पोलीसांनी ट्रक्ट चालकाविरूध्द गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

saurabh shahane injured | saptahik Sandesh karmala news |batmya | accident

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!