रस्त्यावर वाहन लावण्याच्या कारणावरून चौघांकडून एकास कोयत्याने मारहाण - Saptahik Sandesh

रस्त्यावर वाहन लावण्याच्या कारणावरून चौघांकडून एकास कोयत्याने मारहाण

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : रस्त्यावर वाहन लावण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणातून चौघाकडून एकास कोयत्याने व काठीने मारहाण करून गंभीर जखमी केले आहे. हा प्रकार ३ सप्टेंबरला सायंकाळी साडेचारच्या सुमारास हिंगणी ते कुंभारगाव जाणाऱ्या रस्त्यावर घडला आहे.

या प्रकरणी हनुमंत बिभिषण तावरे (रा. हिंगणी ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की ३ सप्टेंबरला सकाळी साडेदहा वाजता माझा ट्रॅक्टर घेऊन रस्त्यावरून सुहास बाबर यांच्या घरासमोर आलो असता, त्यांनी चारचाकी वाहन रस्त्याच्या मधोमध लावले होते. मी हॉर्न वाजवल्यावर त्यांनी मला शिवीगाळ केली. त्यानंतर सायंकाळी मी साडेचार वाजता काम करून त्या रस्त्यावर परत आलो असता राजेंद्र बाबर यांनी त्याच्या घरासमोर ट्रॅक्टर आडवला व तुला मस्ती आलीय काय.. तु आम्हाला ट्रॅक्टर आडवा लावतोय काय.. असे म्हणून लाकडी काठीने डाव्या पायावर मारले.

त्यावेळी सागर बाबर याने तेथेच पडलेला दगड उचलून कमरेच्या बाजूला मारला. त्यानंतर राजेंद्र बाबर हा ऊसतोडीचा कोयता घेऊन आला व त्याने डाव्या हाताच्या खांद्यावर मारून जखमी केले. सुहास बाबर, दादासाहेब किसन बाबर यांनी दोन्ही कानावर मारहाण करून पाय तोडतो म्हणून धमकी दिली. या प्रकरणी पोलीसांनी चौघांच्या विरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!