वाशिंबे येथे ट्रॅक्टरच्या दोन ट्रॉल्याची चोरी - Saptahik Sandesh

वाशिंबे येथे ट्रॅक्टरच्या दोन ट्रॉल्याची चोरी

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : वाशिंबे (ता. करमाळा) येथे शेतामध्ये लावलेल्या दीड लाख रूपये किंमतीच्या दोन चारचाकी ट्रॉल्या चोरीला गेल्या आहेत. हा प्रकार १ सप्टेंबरच्या मध्यरात्री घडला आहे. यात अमोल रामदास भोंग (रा.वाशिंबे) यांनी फिर्याद दिली आहे.

त्यात त्यांनी म्हटले आहे, की माझ्याकडे ट्रॅक्टर व दोन ट्रॉल्या असून त्या ऊस वाहतुकीसाठी उपयोग करतो. १ सप्टेंबरला सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास मी शेतातील कामे आटोपून ट्रेलर व ट्रॅक्टर शेताच्या ठिकाणी लावलेला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी २ सप्टेंबरला शेतात गेलो असता, माझ्या दोन्ही ट्रॉल्या चोरट्यांनी चोरून नेल्याचे आढळून आल्या आहेत. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!