श्री.नीळ यांना चौघांकडून जीवे मारण्याची धमकी – चौघांविरूध्द गुन्हा दाखल

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : शेताततील प्रत्रा शेड काढून टाकू नका, असे म्हटल्याच्या कारणावरून चौघांकडून शिवीगाळ करून, जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी चौघांविरूध्द करमाळा पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी सतिश मधुकर नीळ (वय 42) रा.निमगाव ह ता.करमाळा यांनी फिर्याद दिली असून त्यात त्यांनी म्हटले की, काल (ता.६) निमगाव ह येथील शेती गट नं 70 मध्ये असलेले पत्राशेड येथुन गौंडरे येथे कामानिमित्ताने जात असताना मला माझे शेती गट नं 70 येथील पत्राशेडचे जवळ 1) मारुती विनायक नीळ २) माणिक विनायक नीळ 3) भाउसाहेब विश्वंभर नीळ 4) दादासाहेब देवराव नीळ (सर्व रा.निमगाव ह ता.करमाळा) यांनी येवुन माझे स्वत: चे शेती गट नं 70 अतिक्रमण करुन माझे पत्राशेड मोडुन तोडुन नुकसान करीत होते.

त्यावेळी मी वरील लोकांना म्हणालो की, आरे तुम्ही काय करता ते तोडु नका असे म्हणालो असता 1) मारुती विनायक नीळ हा मला म्हणाला की, तु ये इकडे तुझी ही अशीच अवस्था करतो असे म्हणुन त्यांनी मला शिवीगाळी करुन जिवे मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी करमाळा पोलिसांनी चौघांविरूध्द गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.

keywords : Satish Neel | sateesh Nil Nimgaon H Karmala News | Dhamaki | crime fir gunha dakhal | maruti vinayak Neel | Nil | bhausaheb | dadasaheb | manik Neel Nil | Nimgav | saptahik Sandesh News | Marathi News | karmala police station Solapur

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!