टेंपोची बॅटरी चोरणाऱ्यास रंगेहाथ पकडले - करमाळा बसस्थानकाजवळील प्रकार... - Saptahik Sandesh

टेंपोची बॅटरी चोरणाऱ्यास रंगेहाथ पकडले – करमाळा बसस्थानकाजवळील प्रकार…

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : करमाळा शहरातील रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या टेम्पोची बॅटरी चोरून नेणाऱ्या चोरस रंगेहात पकडले असून, त्याला करमाळा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे, हा प्रकार ७ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजता करमाळा शहरातील बस स्थानकाजवळील पंजाब वस्ताद चौकातील कुरेशी मोहल्ला गल्लीत घडला आहे, याप्रकरणी नजर सम्मत कुरेशी (वय 27 वर्षे धंदा – पान टपरी रा.पंजाब वस्ताद चौक कुरेशी मोहल्ला करमाळा ता.करमाळा) यांनी करमाळा पोलिसात फिर्याद दिली आहे.

दिलेल्या फिर्यादीत त्यांनी म्हटले की, ६ सप्टेंबरला रोजी रात्री १०:३० वा. सुमारास माझ्या अत्याचा मुलगा अजरुद्दीन गुलाम कुरेशी यांचे मालकीची आयशर गाडी क्र. एम. एच.१४ वाय,१८७५ हि गाडी करमाळा बस स्टँडचे कंपाऊटचे बाहेरिल बाजुस लावलेली होती, ७ सप्टेंबर रोजी मी व सैफाली मोहम्मद हफिस कुरेशी,मोहम्मद रफिक गुलाम कुरेशी, सलिम इब्राहिम कुरेशी असे आम्ही भाचा मोहम्मदसैफ रफिक कुरेशी हा शहा हाँस्पीलट येथे अँडमिट असल्याने त्याला बघण्यासाठी आम्ही सर्वजण रात्री १० वा.चे सुमारास गेलो होतो.

त्याला भेटुन आम्ही सर्वजण घराकडे येत असताना माझ्या आत्याच्या मुलाची लावलेली आयशर गाडीची बॅटरी काढुन एक व्यक्ती बस स्थानकाच्या कंपाऊट्चे शेजारी असलेल्या गवतात बॅटरी टाकताना आम्ही त्यास पाहिले व त्याला जागीच पकडुन तो काय करत आहे ? असे त्याला विचारले असता तो म्हणाला की मी गाडीचा मालक आहे, असे तो आम्हाला म्हणाला… त्यावेळी आम्ही त्याला म्हणालो की गाडी आमची आहे, तु खरे सांग तु कोण आहे. तु गाडीची बँटरी काढुन गवतात ठेवताना आम्ही तुला बघीतले आहे.

त्यावेळेस तो आम्हाला म्हणाला की, मला कोणीही नाही मला मारु नका असे म्हणाल्यानंतर आम्ही त्यास नाव, गाव विचारता त्याने त्याचे नाव दादा रामभाऊ देडे (रा.नाणेवाडी ता.जामखेड जि.अ.नगर) असे असल्याचे सांगितले. त्यानंतर आम्ही त्याला करमाळा पोलिसांना फोन करून त्यांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी करमाळा पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.

Karmala Crime News| Marathi News | Batmya| Batami | Solapur | Saptahik Sandesh| Digital Sandesh

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!