करमाळा शहरातुन ३९ वर्षांची विवाहिता बेपत्ता..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा शहरातील ३९ वर्षांची विवाहित महिला 9 डिसेंबर पासून बेपत्ता झाली आहे. तिचा शोध घेवूनही शोध न लागल्याने करमाळा पोलिसात हरवल्याची तक्रार ११ डिसेंबरला नोंदविण्यात आली आहे. या महिलेच्या पतीने सदरची करमाळा पोलिसात तक्रार दिली आहे.
त्यात त्यांनी म्हटले कि, ९ डिसेंबरपर्यंत दुपारी २ वाजेपर्यंत घरी होती, त्यानंतर ती घराबाहेर गेली आलीच नाही. सदरची महिला अर्थिक प्रकरणातून अडचणीत आल्याने बेपत्ता झाली आहे. अशी करमाळा शहरात चर्चा सुरु आहे. सदर महिलेचा संपर्क झाल्यास करमाळा पोलिसात संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.