शेतीच्या कारणावरून मांगी येथे बेदम मारहाण – एकमेकांविरूध्द फिर्याद – गुन्हे दाखल..
करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : कोर्टात चालू असलेली केस काढून घे.. मला माझी जमीन विकायची आहे, असे म्हणून तिघा जणांनी गजाने, हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे. अशी फिर्याद मधुकर रामचंद्र लांडगे यांनी दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की मी मांगी येथे राहत असून, माझे वडील रामचंद्र यांच्याकडून माझे मामा राजाराम बाबूराव अस्वले यांनी आम्हाला विश्वासात न घेता जमीन विकत घेतली आहे.
याबाबत मी कोर्टात दावा दाखल केला असून तो दावा चालू आहे. ८ फेब्रुवारीला सकाळी साडेनऊ वाजता माझ्या शेतात घास कापीत असताना राजाराम अस्वले, त्याचा मुलगा अतुल अस्वले व पत्नी विमल अस्वले हे तेथे आले व तु तो दावा काढून घे.. मला जमीन विकायची आहे. असे म्हणाले. त्यांनी माझ्या डोक्यात गजाने मारहाण करून जखमी केले. तसेच माझा पुतण्या आकाश हा सोडविण्यास आला असता, त्यालाही अतुल अस्वले यांनी मारले. तर माझी पत्नी व सुन सोडविण्यास आले असता, त्यांनाही विमल अस्वले यांनी मारहाण केली आहे. या प्रकरणी पोलीसांनी तिघांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
त्यानंतर शेतीच्या कारणावरून चौघांनी येऊन बेदम मारहाण केल्याची फिर्याद विमल राजाराम अस्वले ( रा. वाघाचीवाडी, ह. रा. पुणे) यांनी पोलीसात दिली. त्यात त्यांनी म्हटले आहे, की.. ८ फेब्रुवारीला सकाळी पुणेहून मी व माझे पती राजाराम अस्वले व मुलगा अतुल असे आम्ही आमचे शेतात सकाळी नऊ वाजता मांगी येथे गेलो. तेथे मधुकर लांडगे हा होता. त्यावेळी तो आम्हाला म्हणाला.. शेत माझे आहे. तुम्ही बाहेर जावा. त्यावेळी मी त्यास म्हणाले, की शेताचा उतारा दाखत्त. त्यावेळी त्याने नितीन लांडगे, वसंत लांडगे, सुंदराबाई मधुकर लांडगे (रा. हिवरवाडी) यांना बोलावून घेतले व आम्हाला त्यांनी हाताने व लाकडी काठीने मारहाण करून शिवीगाळ देऊन धमकी दिली आहे. या प्रकरणी पोलीसांनी चौघाविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.