श्री कुंभेश्वर मंदिर जीर्णोध्दार व महाशिवरात्री निमित्त स्थिर प्राणप्रतिष्ठाण व कलशारोहण समारंभ.. - Saptahik Sandesh

श्री कुंभेश्वर मंदिर जीर्णोध्दार व महाशिवरात्री निमित्त स्थिर प्राणप्रतिष्ठाण व कलशारोहण समारंभ..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : श्री कुंभेश्वर ( महादेव ) मंदिर जीर्णोध्दार व महाशिवरात्री निमित्त कुंभारगाव (ता.करमाळा) येथे शिवमहापुराण कथा प्रेमयज्ञ तसेच स्थिर प्राणप्रतिष्ठाण व कलशारोहण समारंभ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

शिवमहापुरण कथेचा शुभारंभ ८ फेब्रुवारीला शोभा यात्रा काढून व पोथी पुजनाने झाला असून, यावेळी भाविकांनी मोठी गर्दी केली होत. हा कार्यक्रम १८ फेब्रुवारी पर्यंत चालू राहणार आहे. शिवमहापुराण कथा कार्यक्रमात प.पू.श्री भार्गव मुनीषजी महाराज (श्रीधाम, अयोध्या ) हे आपल्या वाणीतून कथा सांगणार असून, श्रीराम कथा मर्मज्ञ श्री सोनु पुजारीजी (श्रीधाम, अयोध्या ) हे सांगणार आहेत.

दहा दिवस चालू राहणाऱ्या शिवमहापुराण कथा कार्यक्रमात ९ फेब्रुवारीला शिवमहापुराण महात्मा, १० फेब्रुवारीला शिवनाम महिमा, ११ फेब्रुवारीला रूद्राक्षकथा, १२ फेब्रुवारीला शिवविवाह, १३ फेब्रुवारीला गणेश जन्म, १४ फेब्रुवारीला मा कालीमाता, १५ फेब्रुवारीला श्री रामकथा, १६ फेब्रुवारीला विवाह, १७ फेब्रुवारीला बारह ज्योर्तिलिंग महाराज की विदाई व १८ फेब्रुवारीला शिवलिंग स्थापना, यज्ञ व महारूद्राभिषेक असे कार्यक्रम होणार आहेत.

शिवमहापुराण कथा कार्यक्रमास येणाऱ्या श्री लक्ष्मीनारायण भाविकांसाठी दररोज सायंकाळी सहा ते आठ महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. कुंभारगाव येथील श्री कुंभेश्वर (महादेव ) मंदिराचा जिर्णोध्दार झाला असून, १८ फेब्रुवारीला या मंदिरात स्थिर प्राणप्रतिष्ठाण व कलशारोहण समारंभ होणार आहे. यानिमित्त १९ फेब्रुवारीला सकाळी ह.भ.प. सतीश महाराज शास्त्री यांचे काल्याचे किर्तन होणार असून त्यानंतर मुरलीधर फरतडे यांच्या सौजन्याने उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.

तरी करमाळा शहर व तालुक्यातील भाविकांनी शिवमहापुराण कथेचा लाभ घेण्यासाठी व मुर्ती प्राणप्रतिष्ठान व कलशारोहण कार्यक्रमास उपस्थित रहावे; असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक श्री कुंभेश्वर (महादेव ) मंदिर सेवा समिती व कुंभारगाव ग्रामस्थांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!