शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना लाच घेताना पकडले-25 हजार रूपये लाच घेतली
करमाळा (संदेश प्रतिनिधी) : जिल्हा परिषद प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना 25 हजार रूपयाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. आज (ता.31) सोमवारी सायंकाळी ही घटना घडली आहे.
शासकीय काम करण्यासाठी जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी तक्रारदार व्यक्तीला पैशांची मागणी केली. तक्रारदार व्यक्ती आणि शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्यात तडजोड होऊन 25 हजार रूपयात सौदा ठरला होता. त्यानंतर तक्रारदारांने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.
तक्रार आल्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी सायंकाळी सोलापूर जिल्हा परिषदेत सापळा लावला होता. तक्रारदार व्यक्तीकडून 25 हजार रुपयांची लाच स्वीकारताना शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. या प्रकरणी पोलीसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. श्री. लोहार यांना कालच विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.