वडशिवणे येथील युवतीचा विनयभंग दाखल - युवकाच्या विरूध्द गुन्हा - Saptahik Sandesh

वडशिवणे येथील युवतीचा विनयभंग दाखल – युवकाच्या विरूध्द गुन्हा

करमाळा / संदेश प्रतिनिधी

करमाळा : वडशिवणे (ता. करमाळा) येथील २० वर्षाच्या युवतीचा तरूणाने विनयभंग केला आहे. हा प्रकार २७ ऑक्टोबरला दुपारी साडेबारा वाजता युवतीच्या घरात घडला आहे. या प्रकरणी पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.

यात २० वर्षाच्या युवतीने फिर्याद दिली आहे. त्यात तिने म्हटले आहे, की २७ ऑक्टोबरला दुपारी साडेबारा वाजता माझे आई-वडील सरपण आणण्यासाठी रस्त्याच्या पलिकडे गेले होते. मी घरात एकटीच होते. त्यावेळी गावातील बाबासाहेब गौतम काकडे हा घरात आला व मला म्हणाला.. तु मला आवडतेस. माझे तुझ्यावर प्रेम आहे. त्यावेळी मी घरातून बाहेर जात असताना त्याने माझा हात धरून मला जवळ ओढले व माझ्या मनास लज्जा वाटेल असे कृत्य केले.

त्यावेळी मी मोठ्याने ओरडले असता, माझा आवाज ऐकून माझे आजोबा तेथे आले व त्यांनी त्यास तु येथे काय करतोस.. असे विचारले असता, त्यांना दमबाजी करून हिसका मारून तो निघून गेला. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!