आनंदमती नेमचंद दोशी यांचे निधन..

‘करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा : येथील श्रीमती आनंदमती नेमचंद दोशी (वय-९७) यांचे आज (ता.२६) सायंकाळी साडेपाच वाजता निधन झाले आहे. त्यांचे मागे दोन मुले, सहा मुली, सुना, नातवंडे, परतंवडे असा परिवार आहे.
जैन धर्माचे तत्त्वाचे विशेष पालन करून त्यांनी धार्मिक उपवासाचे व्रत या वयातही जपले होते. कोरोना महामारी वरही त्यांनी कोरोना झाला असता नाही आपल्या खंबीर मनाने इच्छाशक्तीच्या जोरावर या वयातही यशस्वीरित्या मात केली होती.त्यांचेवर उद्या अंत्यसंस्कार करण्यात येणार असून, त्यांच्या मेनरोडवरील घरापासून उद्या सकाळी आठ वाजता अंत्ययात्रा निघणार आहे. प्रसिध्द आडत व सोन्याचे व्यापारी अशोक दोशी व प्रसिध्द कापड व्यापारी राजकुमार दोशी यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या निधनाबद्दल शहरातील व्यापारी वर्गाने दुःख व्यक्त करून श्रध्दांजली अर्पण केली आहे.