जिल्हास्तरीय तलवारबाजी स्पर्धेमध्ये यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील रोहित दळवी प्रथम - Saptahik Sandesh

जिल्हास्तरीय तलवारबाजी स्पर्धेमध्ये यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील रोहित दळवी प्रथम

करमाळा : क्रीडा व युवा सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत आयोजित केलेल्या शालेय जिल्हास्तरीय तलवारबाजी स्पर्धेमध्ये करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचा विद्यार्थी रोहित अशोक दळवी याने 19 वर्षाखालील गटात तलवारबाजी स्पर्धेत फॉइल या प्रकारामध्ये प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

Rohit Dalavi Pothare Fencing competition first in solapur district

या स्पर्धा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सोलापूर यांनी सोलापूर क्रीडा संकुलमध्ये या शालेय जिल्हास्तरीय स्पर्धा आयोजित केल्या होत्या. रोहित इयत्ता 12 वी science मध्ये शिकत असून तो करमाळा तालुक्यातील पोथरे गावचा सुपुत्र आहे. प्रशिक्षक नागनाथ बोळगे यांचे रोहितला मार्गदर्शन मिळाले. या निवडीनंतर पोथरे येथील प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात हरिश्चंद्र झिंजाडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Rohit Dalvi of Yashwantrao Chavan College karmala district solapur stood first in district level fencing competition | trainer Nagnath Bolage| saptahik sandesh

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!