शालेय स्पर्धा परीक्षेत धवल इंदुरेची राज्यस्तरावर चमकदार कामगिरी -

शालेय स्पर्धा परीक्षेत धवल इंदुरेची राज्यस्तरावर चमकदार कामगिरी

0

करमाळा संदेश प्रतिनिधी

करमाळा, ता.२७: शहरातील भवानी पेठ येथील धवल केतन इंदुरे या विद्यार्थ्याने विविध शालेय स्पर्धा परीक्षांमध्ये राज्यस्तरावर उल्लेखनीय यश संपादन करत करमाळ्याचे नाव उज्ज्वल केले आहे.

राज्यातील नामांकित शैक्षणिक संस्थांकडून दरवर्षी विद्यार्थ्यांना लोकसेवा व राज्यसेवा परीक्षांचा प्राथमिक अनुभव मिळावा या उद्देशाने विविध स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षांमध्ये सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता, गणित तसेच इंग्रजी व मराठी व्याकरण अशा विषयांचा समावेश असतो. राज्यभरातून लाखो विद्यार्थी या परीक्षांना बसतात.

धवलने IAS, मंथन, लक्षवेध आणि “विनर ऑफ द इयर” या स्पर्धा परीक्षांमध्ये अनुक्रमे राज्यस्तरावर २, ३, ४ आणि ७ असे मानांकित क्रमांक मिळवले. याशिवाय इतर तीन स्पर्धांमध्येही त्याने जिल्हा व तालुका स्तरावरील गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे.या उल्लेखनीय कामगिरीबद्दल धवलचा पुणे, सातारा आणि अहिल्यानगर येथे सन्मान करण्यात आला. बारामती येथे जय पवार यांनी त्याचे विशेष कौतुक करत शाबासकी दिली.

तसेच भवानी पेठ परिसरात नगरसेवक श्री. सचिन गायकवाड, सुनील बनसुडे आणि तुकाराम इंदलकर यांनीही धवलचा सन्मान करून शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!