पांगरे येथील भैरवनाथचे पुजारी दिलीप गुरव यांचे निधन

करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा ,ता.24: पांगरे (ता. करमाळा) येथील भैरवनाथ देवस्थानचे पुजारी दिलीपकाका गुरव (वय – ५५) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने नुकतेच निधन झाले आहे. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, सुन, नातवंडे असा परिवार आहे. गावातील सर्वांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या आकस्मात जाण्याने पांगरे ग्रामस्थांनी दुखवटा पाळला आहे.