करमाळा येथील गणेश गवळी यांचे निधन

करमाळा(दि.२): करमाळा शहरातील खडकपुरा गल्ली येथील रहिवासी आणि वकील क्लार्क म्हणून कार्यरत असलेले गणेश दत्तात्रय गवळी (वय ४६) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे.
गणेश गवळी यांच्या पश्चात आई, पत्नी, एक भाऊ, भावजय, एक मुलगा, एक मुलगी आणि बहीण असा परिवार आहे. कमलाई लॅबचे मालक महेश गवळी यांचे ते थोरले बंधू होते.
त्यांच्या अंत्यसंस्कार विधी सोमवार, २८ एप्रिल रोजी करमाळा येथे संपन्न झाले. यावेळी शहरातील विविध क्षेत्रांतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.






