पोथरे येथील सावित्राबाई हिरडे यांचे निधन

करमाळा (दि.२): पोथरे येथील सौ. सावित्राबाई मच्छिंद्र हिरडे (वय-६८) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने गुरूवारी (ता. १) रोजी निधन झाले. त्यांचेवर पोथरे येथील गायरानवाडीतील स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोथरे व परिसरातील मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या मागे पती, दोन मुले, सुना, नातवंडे, एक मुलगी, जावई असा परिवार आहे. मारूती हिरडे व राजेंद्र हिरडे यांच्या त्या मातोश्री होत.






