जिंती येथील केशव ओंभासे यांचे निधन
करमाळा : जिंती (ता. करमाळा) येथील केशव पंढरीनाथ ओंभासे यांचे अल्पशा आजाराने राहत्या घरी निधन झाले. ते 80 वर्षाचे होते.ते अत्यंत कष्टाळू, प्रेमळ, संयमी स्वभावाचे होते. संपूर्ण आयुष्य ते स्वावलंबी जीवन जगले.सामाजिक कार्यकर्ते आणि आदर्श शिक्षक सयाजीराजे केशव ओंभासे यांचे ते वडील होते. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, चार मुली आणि नातवंडे असा परिवार आहे.