केम येथे कृष्णजन्माष्टमी निमित्त हरिनाम सप्ताहाचे आयोजन
केम (प्रतिनिधी-संजय जाधव) :केम ( ता. करमाळा) येथील श्रीराम मंदिरात कृष्णजन्माष्टमी निमित्त अखंड हरिनाम सप्ताह दिनांक १२ ऑगस्ट ते १९ ऑगस्ट या कालावधीत आयोजीत केला आहे.
या सप्ताहात काकडा आरती, ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ असे नित्यनेम धार्मिक कार्यक्रम होणार आहे. या सत्पाहात ह.भ.प. बंडू जाधव, ह.भ.प भुजंग तळेकर, ह.भ.प. मारूती पळसकर, ह.भ.प.दादा बोंगाणे, ह.भ.प. मच्छिंद्र तळेकर, ह,भ,प,शेळके महाराज, ह.भ.प.वाघमोडे, ह.भ.प. विंचू महाराज, ह.भ.प.भोसले महाराज, ह.भ.प. विजयाताई पंडित, ह.भ.प. दादा बोंगाणे, ह.भ.प. रवि महाराज ह.भ.प. डॉ मच्छिंद्र नांगरे, प्राध्यापक श्री ऊत्तरेश्वर ज्युनिअर कॉलेज केम, ह.भ.प. थिटे महाराज यांची कीर्तन व प्रवचने होणार आहेत. तर काल्याचे किर्तन ह.भ.प. सुधीर वालवडकर यांचे होणार आहे. त्यानंतर ज्ञानेश्वर दिक्षीत यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या सप्ताहचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री राम भजनीमंडळ व ग्रामस्थ यांनी केले आहे.