स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषदच्यावतीने 375 फूट तिरंगी झेंड्याची करमाळ्यातून रॅली…
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : भारत देश स्वतंत्र होऊन 75 वर्ष पूर्ण झाली असून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षांमध्ये भारत देश पदार्पण करत आहे, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद करमाळा यांच्यावतीने 375 फूट तिरंगी झेंडा रॅलीचे आयोजन करमाळा शहरातून करण्यात आले. या उपक्रमांमध्ये करमाळा शहरातील विविध शाळांनी सहभाग घेतला.
यामध्ये अण्णासाहेब जगताप प्रशाला , कन्या प्रशाला या शाळांनी सहभाग नोंदवला या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये देश प्रेमाची भावना वाढावी व अमृत महोत्सवी वर्षापूर्वी आनंद उत्सव साजरा करण्याचा हेतू होता, या कार्यक्रमासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रदेश संघटन मंत्री अभिजीत पाटील उपस्थित होते, तसेच या कार्यक्रमासाठी विविध सामाजिक क्षेत्रातील , राजकीय क्षेत्रातील व शैक्षणिक क्षेत्रातील लोकांनी सहभाग नोंदवला . या कार्यक्रमसाठी 1000 हुन अधिक विद्यार्थी व कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला.
या कार्यक्रमां साठी पुणे विभाग संयोजक सौरभ शिंगाड़े , प्रदेश कार्यकारणी सदस्य शुभम बंडगर , करमाळा शहर मंत्री संकेत दयाल , संतोष कांबळे , जिल्ह्यासंयोजक पार्थ तेरकर , जिल्हासह संयोजक हितेश पुंज, सचिन पारवे , प्रदीप वाघमोडे , सौरभ सलगर , प्रताप आरकिले , संघर्ष दयाल , शुभम आदि कार्यकर्ते उपस्थित होते.