संगणक व माहिती तंत्रज्ञान पदवी अभ्यासक्रम दत्तकला महाविद्यालयात सुरू - प्रा.झोळ - Saptahik Sandesh

संगणक व माहिती तंत्रज्ञान पदवी अभ्यासक्रम दत्तकला महाविद्यालयात सुरू – प्रा.झोळ

करमाळा : स्वामी- चिंचोली (भिगवण)येथील दत्तकला शिक्षण संस्थेच्या दत्तकला ग्रुप ऑफ इंस्टीट्यूशन्स च्या महाविद्यालयास माहिती तंत्रज्ञान अभियांत्रिकी व इलेक्ट्रॉनिक्स आणि संगणक अभिांत्रिकी पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यास अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद( AICTE) व राज्य शासनाने मान्यता दिली आहे.

सध्या या महाविद्यालयात विद्युत अभियांत्रिकी, यांत्रिकी अभियांत्रिकी, स्थापत्य अभियांत्रिकी या अभ्यासक्रमाचे पदवी व पदव्युत्तर(UG &PG) शिक्षण दिले जात आहे. त्याचबरोबर या वर्षी पासून माहिती तंत्रज्ञान अभियांत्रिकी(IT) व इलेक्ट्रॉनिक्स आणि संगणक अभिांत्रिकी(ELECTRONICS & COMPUTER ENGINEERING) हे दोन पदवी अभ्यासक्रम चालू करण्यास परवानगी दिली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन प्रा.रामदास झोळ यांनी केले आहे.

प्रा. रामदास झोळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!