पोथरे येथे दहिहंडी कार्यक्रम मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न - Saptahik Sandesh

पोथरे येथे दहिहंडी कार्यक्रम मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : पोथरे (ता.करमाळा) येथे दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी नंदरगे परिवाराने दहीहंडीचा उत्सव आयोजित केला होता, या उत्सवाला पोथरे गावातील तरुणांनी मोठ्या स्वरूपात प्रतिसाद देत दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साही वातावरणात पार पाडला.

प्रतिवर्षीप्रमाणे नंदरगे परिवाराने याही वर्षी दहीहंडी उत्सव आयोजित करून जो युवक वर्ग दहीहंडी फोडेल त्यांना बक्षीसाचे आयोजन केले होते, त्याप्रमाणे यावर्षीचे २१००/- रुपयांचे बक्षीस पोथरे येथील तरुणांनी जिंकले. यामध्ये सोमनाथ झिंजाडे, वामन पठाडे, शरद झिंजाडे,दयानंद रोही,संतोष ठोंबरे,लखन झिंजाडे, कार्तिक रणवरे,संजय पुराणे राजेश झिंजाडे, रणजित रणवरे, अनिकेत रणवरे,दादासाहेब झिंजाडे, या युवकांनी गोविंदा पथक तयार करून दहीहंडी फोडली व २१००/- रुपयांचे बक्षीस पटकावले.

यावेळी हा उत्सव पाहण्यासाठी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेषतः महिलांची संख्या जास्त होती. याप्रसंगी पोथरेचे माजी सरपंच प्रतिनिधी हरिश्चंद्र झिंजाडे, हरिभाऊ हिरडे, दादासाहेब झिंजाडे, नितीन झिंजाडे, गणेश ढवळे, बाळु जाधव, कैलास जाधव, नबीलाल शेख तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी आयोजकांनी उपस्थित ग्रामस्थांसमोर बक्षीस वितरण करून पुढीलवर्षी यापेक्षा मोठ्या स्वरुपात बक्षीस देण्याचे आयोजन करू असे आश्वासन आयोजक संदीप नंदरगे यांनी युवकांना दिले. याप्रसंगी या कार्यक्रमासाठी सोमनाथ नंदरगे, संदीप नंदरगे, पप्पू नंदरगे, बाळासाहेब नंदरगे, चक्रधर नंदरगे, हरी नंदरगे आदींनी यशस्वी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!