वडगाव(उ) येथील निशा वाडेकर हिचे सीईटी परीक्षेत सुयश
करमाळा (संदेश प्रतिनिधी) – उत्तर वडगाव येथील ग्रामीण भागातील विद्यार्थीनी निशा शरद वाडेकर हिने बारावी सायन्स मध्ये 81.17 गुण मिळविले आहेत. तसेच MHT-CET ( PCB) ग्रुप ला 96.40% व
सायन्स या विषयात 100 पैकी 100 गुण मिळविले आहेत. तिच्या या यशाबद्दल तिचा कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय विवेकानंदाजी वखारे तसेच दादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य संजय नगरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
निशा ही दादा पाटील महाविद्यालय कर्जत येथे शिकायला होती. तिचे 1 ली ते 7 वी पर्यंत चे प्राथमिक शिक्षण जि प प्रा शाळा उत्तर वडगाव येथे तर माध्यमिक शिक्षण प्रगती विद्यालय मांगी येथे झाले. तिचे १० पर्यंतचे सर्व शिक्षण मराठी माध्यमातून झाले असून मराठी माध्यमातून शिकलेले विद्यार्थी कुठेही कमी पडत नाही हे तिने आपल्या यशातून दाखवून दिले आहे. त्यामुळे तिने मिळविलेल्या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.