प्रा.डॉ.मच्छिंद्र नागरे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान
केम (प्रतिनिधी-संजय जाधव) : केम येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित श्री उत्तरेश्वर ज्युनियर कॉलेज मधील प्रयोगशील शिक्षक प्रा. डॉ.मच्छिंद्र नागरे यांना देवदान बहुउद्देशीय सेवाभावी संस्था सांगली आयोजित राज्यस्तरीय आदर्श शिक्षक रत्न पुरस्काराने सांगली याठिकाणी सन्मानित करण्यात आले.
प्राचार्य नागरे यांनी केम सारख्या ग्रामीण भागात विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन अनेक शैक्षणिक उपक्रम राबविलेले आहेत. दर आठवड्याला राबविले जाणारे नवनवीन शालेय उपक्रम , दरवर्षी घेतले जाणारे डॉ बापूजी साळुंखे साहित्य संमेलन , आरोग्य आपल्या दारी , लेखक आपल्या भेटीला , कवी संमेलन , विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास कार्यक्रम 151 वृक्षारोपण लागवड, स्वच्छ्ता अभियान, जागर नवदुर्गाचा असे विविध शैक्षणिक सामाजिक उपक्रम राबविले. त्यामुळेच सोलापूर जिल्ह्यात ग्रामीण भागात गुणवत्तापूर्ण कॉलेज म्हणून श्री उत्तरेश्वर ज्युनियर कॉलेज ओळखले जाते.
या शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ विचारवंत व मा.आमदार प्रा.शरद पाटील , गटशिक्षणाधिकारी डॉ सुरेश माने , पोलीस उपनिरीक्षक श्री विष्णू माळी, श्री अनिल मोहिते इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
या उल्लेखनीय शैक्षणिक कार्याबद्दल श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य श्री अभयकुमार साळुंखे , सचिवा व मार्गदर्शिका सौ शुभांगीताई गावडे, मराठवाडा विभागप्रमुख प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख , श्री उत्तरेश्वर ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य श्री एस बी कदम , शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री दयानंद तळेकर, सर्व गुरुदेव कार्यकर्ते व ग्रामस्थ यांनी त्यांचे अभिनंदन केले.