प्रत्येक कृत्यामागे शास्त्र असते ते आपण समजून घेतले तरच आपली प्रगती - सीमा धाडीवाल - Saptahik Sandesh

प्रत्येक कृत्यामागे शास्त्र असते ते आपण समजून घेतले तरच आपली प्रगती – सीमा धाडीवाल

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा, ता. (१७) : प्रत्येक कृत्यामागे शास्त्र असते ते आपण समजून घेतलेतरच आपली प्रगती होवू शकते. आपण भातात मीठ घालू नये असे म्हणतो, का..? तर अनेक लोक दुध-भात खात होते व खात आहेत, दुध व मीठ यांची दोन टोके आहेत. हे समजून घेतले पाहिजे, असे मत पुणे येथील प्रसिध्द व्याख्यात्या व मैत्रिण ग्रुपच्या संस्थापिका सीमा धाडीवाल यांनी व्यक्त केले.

त्या करमाळा येथील नवकार ग्रुपच्या वतीने करमाळा येथील जैन मंदिर मेन रोड येथे समज-गैरसमज या विषयावर बोलत होत्या. यावेळी आयोजक नवकार ग्रुपच्या प्रमुख अन्य महिला प्रतिनिधी या व्यासपीठावर होत्या.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की आपण बाहेर निघतो तेंव्हा आपल्या हातावर दहीसाखर दिली जातो,का..? त्यामुळे आपली एन्झा यटी कमी होते थोडक्यात म्हणजे हृदयाची धडधड कमी होते निसर्गाने जे सर्वांसाठी दिले आहे, की फुले, पाने, फळे, प्रत्येक झाडाच्या फांद्या या निश्चीतच सर्वांना उपयुक्त असतात, प्रत्येकात एक शास्त्र लपले आहे, ते आपण शोधले पाहिजे व जाणून त्याचा आपल्या जीवनात उपयोग केला पाहिजे.

काल (ता. १५) दुपारी २ ते ५ यावेळेत हा कार्यक्रम संपन्न झाला. विशेष म्हणजे या भाषणासाठी महिलांची मोठी गर्दी झाली होती, यासर्वानी सौ. धाडिवाल यांच्या भाषणाला मोठा प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार मुथा अबॅकसच्या संचालिका ज्योती मुथा यांनी मानले. या कार्यक्रमाचे संयोजन नवकार ग्रुपच्या सदस्या ललीता गादीया, सोनाली गुगळे, प्रीती कटारीया, सपना संचेती, सारिका संचेती, दर्शना बोरा, पूनम मेहता, आरती बलदोटा, वंदना कटारीया यांनी केले होते.


सौ.सीमा दिलीप धाडीवाल या पुणे येथील रहिवासी असून त्यांनी मैत्री ग्रुपची स्थापना केली आहे. यापूर्वी त्यांनी पुणे, अहमदनगर, चिंचवड, राहुरी, दौंड अशा विविध शहरात व्याख्याने दिली आहेत. त्या व्याख्यानाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. त्या स्वत: वक्त्या, लेखीका आहेत. विशेष म्हणजे त्या विनामानधन,विनाप्रवासखर्च व्याख्यान देतात. फक्त त्यांना वेळ फार महत्वाची असून वेळेवर कार्यक्रम सुरू करून वेळेवर संपवतात. करमाळा येथे त्यांच्या व्याख्यानाला प्रचंड प्रतिसाद मिळाला.


Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!