वडशिवणे शाळेस स्व.बागल शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या वतीने आदर्श शाळा पुरस्कार प्रदान - Saptahik Sandesh

वडशिवणे शाळेस स्व.बागल शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या वतीने आदर्श शाळा पुरस्कार प्रदान

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – लोकनेते स्व. दिगंबरराव बागल प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची 18 वी वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक 30 सप्टेंबर 2023 रोजी करमाळा येथे संपन्न झाली. या वार्षिक सभेमध्ये करमाळा तालुका आदर्श शाळा  पुरस्कार म्हणून वडशिवणे शाळेस पतसंस्थेचे चेअरमन सतीश कांबळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

पुरस्कार जाहीर करण्या मागच्या भूमिकेविषयी बोलताना चेअरमन सतीश कांबळे यांनी सांगितले की, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडशिवणे या शाळेमध्ये सन 2018 पासून मुख्याध्यापक सारिका आंधळकर यांनी उपशिक्षक श्री सानप व श्री बादल यांच्या सहकार्याने शाळेला विकसित करताना अनेक उपक्रम राबविले. त्यात स्वच्छ शाळा सुंदर शाळा या उपक्रमात शाळेने तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावला. त्याच पद्धतीने सायन्स वाॅल, परसबाग, वृक्षारोपण, रंगरंगोटी यासारख्या उपक्रमात भाग घेऊन शाळेचे रूप पालटविले. सध्याचे मुख्याध्यापक मधुकर गाडे, उपशिक्षक धनंजय हरिभाऊ दिरंगे हेदेखील शाळेच्या गुणवत्तेबाबत सतत प्रयत्नशील आहेत. या कारणाने या शाळेस आदर्श पुरस्कार जाहीर केला असल्याची माहिती श्री. कांबळे यांनी दिली.

त्याबद्दल शाळा व्यवस्थापन समिती वडशिवणे,   ग्रामपंचायत वडशिवणे सर्व शिक्षणप्रेमी ग्रामस्थांकडून शाळेच्या सर्व आजी माजी शिक्षक, मुख्याध्यापक, कर्मचारी यांचे कौतुक होत आहे.

आदर्श शाळा पुरस्कारामुळे शिक्षकांनी केलेल्या उत्कृष्ट कामाची त्यांना पावती मिळते व त्यांच्या गुणांना प्रोत्साहन मिळते. या उद्देशाने संस्थेच्या वतीने असे हा पुरस्कार देण्यात येणार आहेत.

चेअरमन सतीश कांबळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!