पाथुर्डी येथे आरोग्य शिबिरात 105 जणांची मोफत तपासणी... - Saptahik Sandesh

पाथुर्डी येथे आरोग्य शिबिरात 105 जणांची मोफत तपासणी…

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : करमाळा तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय पाथुर्डी येथे “आयुष्यमान भव” मोहिमेअंतर्गत गावातील लोकांची बीपी, शुगर, तसेच आरोग्य तपासणी करण्यासाठी शिबिराचे प्राथमिक आरोग्य केंद्र केम व ग्रामपंचायत पाथुर्डी यांच्यावतीने आयोजन केले होते.या शिबिरामध्ये गावातील 105 रुग्णांची बीपी शुगर व इतर आजारांची तपासणी करून किरकोळ औषध उपचार करण्यात आला.

यावेळी पत्रकार शितलकुमार मोटे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घघाटन करण्यात आले. यावेळी हे शिबीर यशस्वी करण्यासाठी समुदाय आरोग्य अधिकारी निलेश कुबेर, आरोग्य निरीक्षक अनिल तोडकरी, आरोग्य सेवक दत्ता कावळे,आरोग्य सेविका श्रीमती वर्षा पोद्दार व आशा कर्मचारी श्रीमती भागुबाई हुलगे व श्रीमती खरात,ग्रामपंचायत कर्मचारी दीपक मोटे यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी सरपंच रुक्मिणी मोटे,उपसरपंच प्रकाश खरात, ग्रामपंचायत सदस्य आशाताई तोडेकर,सचिन चांगण,चांगदेव कानडे, विकास सोसायटीचे संचालक चांगदेव मोटे, सदाशिव तोडेकर, धनाजी मोटे, शिवाजी पाडुळे,प्रकाश वैद्य, श्रीमंत मोटे,अंकुश दरगुडे,तानाजी मोटे,विलास खरात आदि ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!