कंदर येथील अभिजीत भांगे यांची ‘केळी उत्पादक शेतकरी’ संघाच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : कंदर (ता.करमाळा) येथील प्रगतशील शेतकरी अभिजीत राजकुमार भांगे यांची नुकतीच केळी उत्पादक शेतकरी संघ महाराष्ट्र राज्य अंतर्गत असणाऱ्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड झाली आहे. केळी पिकामध्ये केलेले विविध प्रयोग तसेच केळी उत्पादकांविषयी त्यांची तळमळ आणि त्याविषयी केलेल्या कार्याची दखल घेऊन ही निवड सोलापूर जिल्हा केळी उत्पादक संघाचे अध्यक्ष महेंद्र दिनकरराव पाटील यांच्या नियुक्ती पत्राद्वारे करण्यात आली आहे.
अभिजीत भांगे यांच्या निवडीबद्दल सोलापूर जिल्हा केळी उत्पादक शेतकऱ्यातून अभिनंदन करण्यात येत आहे. यावेळी कृषी आयुक्त सुनील चव्हाण, राज्य ऊस उत्पादक संघाचे संस्थापक अध्यक्ष अतुल माने पाटील, पुणे विभागीय कृषी सहसंचालक रफिक नायकवडी, महाराष्ट्र राज्य केळी उत्पादक शेतकरी संघाचे संस्थापक अध्यक्ष किरण चव्हाण,सोलापूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, उपविभागीय कृषी अधिकारी बाळासाहेब लांडगे ,जयंत कवडे, सुभाष घुले तसेच समन्वयक सचिन कोरडे पाटील आदी उपस्थित होते.


