ग्रामपंचायत सदस्य म्हणून मिळणारा पाच वर्षाचा मासिक भत्ता जिल्हा परिषद शाळेला देणार – लक्ष्मी सरवदे

0
Lakshmi Sarvade

करमाळा : घारगाव (ता.करमाळा) येथील ग्रामपंचायत सदस्य सौ. लक्ष्मी संजय सरवदे यांनी आपल्याला ग्रामपंचायत सदस्य म्हणून मिळणारा पाच वर्षाचा भत्ता जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या भाषणात त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

पुढे बोलताना सरवदे यांनी सांगितले की, राजकारणात ज्यांना मी नेता समजते असे करमाळा तालुक्याचे लोकप्रिय माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी आपल्या कार्यातून अनेक समाज उपयोगी आणि विकासाची कामे करून जनतेमध्ये आदर्श निर्माण केला त्यांचा आदर्श घेऊन मी देखील माझा पाच वर्षाचा ग्रामपंचायत सदस्याचा मासिक भत्ता गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला देण्याचा निर्णय घेतला‌. ज्या शाळेत माझे व माझे पती संजय सरवदे यांचे देखील प्राथमिक शिक्षण या जिल्हा परिषद शाळेत झाले या शाळेतून चांगले विद्यार्थी घडावेत यासाठी सर्वतोपरी मदत करणार आहे. सरवदे यांच्या निर्णयाचे ग्रामस्थांसह पंचक्रोशी मधून स्वागत होत आहे.

करमाळा तालुक्यातील वाशिंबे येथील सरपंच तानाजी झोळ यांनी देखील आपल्याला मिळणारे मानधन वाशिंबे येथील जिल्हा परिषद शाळेला देणार असल्याचे नुकतेच जाहीर केले होते. सौ. लक्ष्मी सरवदे यांनी देखील आपले मानधन जिल्हा परिषद शाळेला देण्याचे जाहीर केले आहे. अशा प्रकारे जिल्हा परिषद शाळेच्या सुधारणेसाठी राजकिय, सामाजिक व्यक्ती पुढे आले तर जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा नक्कीच सुधारेल अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य जनतेतून येत आहे.

Related News : सरपंच म्हणून मिळणारे पाच वर्षाचे मानधन जिल्हा परिषद शाळेला देणार – तानाजी झोळ

Gram Panchayat Member of Ghargaon (Taluka Karmala). Lakshmi Sanjay Sarvade has decided to give the five-year allowance she gets as a Gram Panchayat member to Zilla Parishad Primary School. She expressed her thoughts in his Republic Day speech.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!