आमदार संजयमामा शिंदे यांचा आदर्श घेवून सरपंच म्हणून मिळणारे पाच वर्षाचे मानधन जिल्हा परिषद शाळेला देणार – तानाजी झोळ..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : वाशिंबे (ता.करमाळा) लोकनियुक्त नुतन सरपंच तानाजीबापू झोळ यांनी 26 जानेवारी रोजी झालेल्या ग्रामसभेमध्ये सरपंचासाठी मिळणारे पाच वर्षांतील मानधन जिल्हा परिषद शाळेला देण्याचा एक आदर्श निर्णय घेतला आहे.
यावेळी श्री.झोळ यांनी सांगितले कि, राजकारणात मी ज्यांना नेता म्हणून काम करतो ते करमाळा आमदार संजयमामा शिंदे यांनी जिल्हा परिषदचे अध्यक्ष असताना आपले मानधन न घेता ते समाज हितासाठी वापरले तोच आदर्श घेत मी माझ्या पाच वर्षाच्या सरपंच पदाच्या कार्यकाळामधील सर्व मानधन वाशिंबे जिल्हा परिषद शाळेसाठी देण्याचा निर्णय घेत आहे.
ज्या शाळेत माझी लहान बहीण शिक्षण घेऊन राज्यसेवेतुन उत्तीर्ण होऊन केंद्रीय उपवनसंरक्षक (IFS) पदापर्यंत पोहचली.असेच विद्यार्थी या शाळेत घडावेत यासाठी सर्वोतोपरी मदत करणार आहे.तसेच भविष्यकाळात रस्ते,आरोग्य, पाणी,वीज यांबाबत ठोस निर्णय गावच्या विकासासाठी घेण्यात येतील असे सांगितले. झोळ यांच्या निर्णयाचे ग्रामस्थांसह पंचक्रोशीमधून स्वागत होत आहे.
