करमाळ्यातील कमलाभवानी देवस्थानची पर्यटन विभाग निधीतून 1 कोटींची कामे पूर्ण – 3 कोटींची कामे प्रगतीपथावर : आ.संजयमामा शिंदे..


करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : श्री.कमलाभवानी देवीचे मंदिर हे करमाळा तालुक्याचे आराध्य दैवत असून, या देवस्थानचा विकास करण्यासाठी 4 कोटी रुपये निधी आपण मंजूर करण्यात आला होता, त्याप्रमाणे त्या निधीमधून पेविंग ब्लॉक व रस्ते सिमेंट काँक्रीट तसेच इतर सुशोभिकरणासाठी असे एकूण 1 कोटी रुपये निधी मंजूर असलेली कामे पूर्ण झाली असून मंदिर परिसरातील रस्ते डांबरीकरण करणे, भक्तनिवास बांधणे वॉल कंपाऊंड बांधणे ,स्ट्रीट लाईट बसवणे ,महिला व पुरुष यांच्यासाठी स्वच्छतागृह बांधणे आदी 3 कोटी रुपये निधी मंजूर असलेली कामे प्रगतीपथावर असल्याची माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली.

याबाबत पुढे ते म्हणाले की, श्री.कमलाभवानी हे करमाळा तालुक्याचे आराध्य दैवत आहे, हे देवस्थान करमाळा शहराच्या लगत असून या देवस्थानचा विकास करण्यासाठी 4 कोटी रुपये निधी आपण मंजूर केला होता. त्या निधीमधून पेविंग ब्लॉक बसविणे – 24 लाख, सर्व रस्ते सिमेंट काँक्रीट करणे – 76 लाख, रस्ते डांबरीकरण करणे – 47 लाख ,भक्तनिवास बांधणे – 80 लाख ,महिला व पुरुषांच्या साठी स्वच्छतागृह बांधणे – 21 लाख 50 हजार ,वॉल कंपाऊंड बांधणे -1 कोटी 43 लाख, स्ट्रीट लाईट बसविणे -15 लाख असा निधी मंजूर होता. या निधीमधून पेविंग ब्लॉक व सिमेंट रस्त्यांची कामे पूर्ण झाली असून बाकी सर्व कामे प्रगतीपथावर आहेत.

आ.संजयमामा शिंदे यांनी 4 कोटी रुपयांचा जो विकासनिधी श्री कमलाभवानी देवस्थानच्या विकासासाठी दिला, त्यामुळे कमलाभवानी मंदिर परिसरासह देवीचामाळचा चेहरा मोहरा बदलला आहे. – महेश सोरटे (सरपंच, देवीचामाळ)

हे रस्ते सिमेंट काँक्रीट झाले
संगोबा रस्ता ते पवार घर
मंदिर कल्लोळ ते पवार घर
सुभाष खोटे घर ते सनी पुराणीक घर
तुकाराम सोरटे ते पंकज थोरबोले घर
दिवाण घर ते व्यंकटेश दळवी घर
शशिकांत चव्हाण घर ते दीपक थोरबोले घर
पीर मंदिर समोरील मैदान.

या ठिकाणी बसविले पेविंग ब्लॉक
घाट पायऱ्या सभोवताली दोन्ही बाजूनी ब्लॉक मंदिरासमोरील बाग
मोरे गल्ली, पीर मंदिर व यमाई मंदिर समोर
जगताप गल्ली, वाघमारे गल्ली ,गोमे गल्ली, लक्ष्मी आई मंदिर बोळ, चव्हाण बोळ, जुनी ग्रामपंचायत बोळ, चोरमले बोळ, सोरटे – मोकाशी बोळ इत्यादी. तसेच वाहनतळ ते खंडोबा मंदिर
स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता, पार्किंग ते पांडे रस्ता या रस्त्यांचे बीबीएम पूर्ण झाले असून फक्त कार्पेट बाकी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!