रावगाव जि.प.शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी भागवत बरडे तर उपाध्यक्षपदी सुहास जौजाळ..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : भास्कर पवार…

करमाळा : रावगाव (ता.करमाळा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेच्या व्यवस्थापन समितीची निवड आज करण्यात आली, असून या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी भागवत बरडे तर उपाध्यक्षपदी सुहास जौजाळ यांची निवड करण्यात आली आहे.

यामध्ये पालक सभा घेवून अध्यक्ष व उपाध्यक्ष तसेच सदस्यांची निवड पालकांमधून करण्यात आली प्रथमतः सदस्यांची निवड करण्यात आली व यामधून भागवत बरडे यांची अध्यक्षपदी तर सुहास जौजाळ यांची उपाध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली, या निवडीचे कामकाज केंद्रीय मुख्याध्यापक बबन पाटोळे सहशिक्षक प्रताप राऊत , महेंद्र शिंदे व सर्व शिक्षक स्टाप यांनी यशस्वीरित्या पार पाडले. निवड झालेल्या अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा सत्कार मुख्याध्यापक व सर्व शिक्षक स्टाफ यांच्यावतीने करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!