दिल्ली नॅशनल चॅम्पियनशिप मैदानी स्पर्धेत 10 खेळाडूंना 9 गोल्ड मेडल तर 5 सिल्वर मेडल प्राप्त..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : दिल्ली या ठिकाणी झालेल्या नॅशनल चॅम्पियनशिप मध्ये मैदानी स्पर्धेत घोटी (ता.करमाळा) येथील आर्या फिजिकल आणि अथलॅटिक्स अकॅडेमी, अकॅडेमीतील 10 खेळाडूंचे सिलेकशन राष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली होती. यामध्ये 9 गोल्ड मेडल व 5 सिल्वर मेडल असे एकूण 14 मेडल मिळाले आहेत.
स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांची नावे…
1)प्रगती देशमुख U 14 100मी धावणे -प्रथम क्रमांक
2)प्रीती जाधव U17 5000मी चालणे -प्रथम क्रमांक
3)वैष्णवी मोरे U17 5000मी चालणे -द्वितीय क्रमांक
4)प्रीतल गांधी U14 लांब उडी -प्रथम क्रमांक
5)ओमराज कांबळे U14 400मी धावणे -द्वितीय क्रमांक
6)ईशायू क्षीरसागर U14 उंच उडी- प्रथम क्रमांक
7) सिद्धार्थ मंजुळे U17 100मी व 200मी धावणे -प्रथम क्रमांक
8)तुषार भोगे U17 100मी -द्वितीय,400मी -प्रथम,5000मी -प्रथम
9)किशोर काळे U19 -5000मी धावणे प्रथम
10) जावेद शेख ओपन -100मी द्वितीय
या सर्व विजयी खेळाडूंची इंटरनॅशनल स्पर्धेसाठी निवड झाली आहे, या सर्व खेळाडूंना कोच अंकुश थोरात सर यांचे मार्गदर्शन मिळाले आहे. या सर्व खेळाडूंचे अनेकांनी कौतुक व अभिनंदन केले.