राजसाहेब फक्त एक पत्र... - Saptahik Sandesh

राजसाहेब फक्त एक पत्र…

माननीय राज साहेब ठाकरे पूर्ण महाराष्ट्र तुमचा चाहता आहे… महाराष्ट्रातील जनतेने तुम्हाला हिंदू जननायक घोषित केले आहे… महाराष्ट्राला तुमच्या कडून खूप अपेक्षा आहेत… संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या कडे आशेने पाहत आहे… राज साहेब तुमच्या एका शब्दावर पूर्ण महाराष्ट्र फिरतो…

विकासासाठी, मराठी माणसे ,मराठी भाषा यासाठी तुमची आंदोलने संपूर्ण महाराष्ट्र पहात असतो. मराठी भाषा,मराठी माणसे,मुंबईतील मराठी माणूस यासाठी तुमचे योगदान खूप मोठे आहे. जे काम कुठेच होत नाही, त्याला शेवटचा पर्याय राजसाहेब ठाकरे असतात.

राजसाहेब मुंबईमधील अंधेरी पूर्व विधानसभा मध्ये राजेश लटके यांच्या मृत्यूनंतर होणार पोटनिवडणुकीमध्ये शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांच्या कडून राजेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके उमेदवार होत्या. भाजपकडून मुरजी पटेल रिंगणात होते.

परंतु तुम्ही भाजपला एक पत्र लिहून उमेदवार माघार घेण्यास भाग पाडले. तुमच्या पत्राची भाजप हायकमांडने देखील दखल घेऊन निवडणूक बिनविरोध केली. यावरून आम्हाला तुमचा राजकीय दबदबा दिसून आला.

राज साहेब हे झालं राजकीय परंतु, सध्याच्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले आहे.. हाताशी आलेले पीक गेले.त्यासोबत शेतकर्यांचा इच्छा, स्वप्न पण धुऊन गेली.. पाऊस शेतकऱ्याचा दुश्मन बनल आहे..राज्यातील बेरोजगारी वाढत आहे. कित्येक मुले शिक्षणापासून वंचित आहेत.

राज साहेब जसे तुम्ही पोटनिवडणुकीसाठी एक पत्र पाठवले. तसे शेतकऱ्यांना सरसकट कोणत्याही किचकट प्रक्रिये शिवाय मदत मिळावी म्हणून सरकारला एक पत्र पाठवा. कित्येक वर्ष झाली मराठा आरक्षणासाठी मराठ्यांचा लढा सुरू आहे. मराठ्यांना आरक्षण मिळण्यासाठी सरकारला एक पत्र पाठवा.. कित्येक मराठा शेतकऱ्यांची मुले फी वाचून उच्च शिक्षणापासून वंचित आहेत… आर्थिक निकषावर शैक्षणिक फी ठरवण्यासाठी सरकारला एक पत्र पाठवा.. शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव मिळावा म्हणून एक पत्र पाठवा…. शेतकरी आत्महत्या कायमस्वरूपी बंद व्हाव्या यासाठी सरकारला एक पत्र पाठवा…

राजसाहेब पोटनिवडणुक बिनविरोध करण्यासाठी सरकारला जसे एक पत्र पाठवले …तसे एक पत्र या मागण्यासाठी सरकारला पाठवा…राजसाहेब पोटनिवडणुक बिनविरोध करण्यासाठी सरकारला जसे एक पत्र पाठवले …तसे एक पत्र या मागण्यासाठी सरकारला पाठवा…

राजसाहेब फक्त एक पत्र...

✍️ तुषार तळेकर, केम (ता.करमाळा), मो. 7798943077

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!