सरपंच परिषदेचे तालुकाध्यक्ष डॉ.अमोल दुरंदे यांच्या वाढदिवसानिमित्त राजेश्वर हाॅस्पिटल येथे 104 जणांनी केले रक्तदान.. - Saptahik Sandesh

सरपंच परिषदेचे तालुकाध्यक्ष डॉ.अमोल दुरंदे यांच्या वाढदिवसानिमित्त राजेश्वर हाॅस्पिटल येथे 104 जणांनी केले रक्तदान..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : राजुरी (ता.करमाळा) येथील परिवर्तन प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व राजुरी ग्रामपंचायत सरपंच तसेच सरपंच परिषदेचे करमाळा तालुकाध्यक्ष डॉ.अमोल दादासाहेब दुरंदे यांच्या 38 व्या वाढदिवसानिमित्त राजुरी मधील राजेश्वर हाॅस्पिटल येथे 104 जणांनी रक्तदान केले.

या कार्यक्रमामध्ये सामाजिक, राजकीय,शैक्षणिक इ. क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. तसेच करमाळा मेडिकोज गिल्डचे डॉक्टर देखील या प्रसंगी उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमासाठी श्री कमलाभवानी रक्तपेढी यांचे सहकार्य लाभले.

याप्रसंगी डॉ.दुरंदे म्हणाले की, आपण सर्वजण दशकाहुन अधिक काळ सामाजिक काम करत आहेत.या कामातुन नवनवीन संकल्पना सुचत असतात . स्वच्छता अभियान ,वृक्षारोपण, जलसंधारण,रस्ते निर्माण,विज, पाणी पुरवठा, शिक्षण, रक्तदान शिबिर या संबंधात असे विविध सामाजिक उपक्रम हाती घेतले जातात. परिणामी गाव बदलासाठी (परीवर्तन) आपण एकत्र येऊन काम करत आहोत.अलीकडे कोरोनानंतर आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे सध्या रक्त संकलन केंद्रात रक्त बॅग तुटवडा हे लक्षात घेऊन, माझ्या जन्मदिवसाचे औचित्य साधुन अनेक गरजू रूग्णांचे प्राण वाचविण्यासाठी आपण रक्तदान शिबिराचे आयोजन करत आहोत.

या प्रसंगी नवनाथ दुरंदे , गणेश जाधव (अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती ), दादासाहेब गायकवाड ( माजी सरपंच गोयेगाव ),नरेंद्र सिंह ठाकुर( भाजपा तालुका सचिव), कोडलिंगे भाऊसाहेब( सचिव, राजुरी विकास सेवा सोसायटी ),संतोष गदादे,बंडू टापरे,मारुती साखरे सर, रामदास शिंदे, रेवन बोबडे, नागेश मोरे आदीजण उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!