कंदर येथील कण्वमुणी विद्यालय व शंकरराव भांगे प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.. - Saptahik Sandesh

कंदर येथील कण्वमुणी विद्यालय व शंकरराव भांगे प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न..

कंदर संदेश प्रतिनिधी /संदीप कांबळे..

कंदर : कंदर (ता करमाळा) येथील कण्वमुणी विद्यालय व शंकरराव भांगे मालक प्राथमिक विद्यामंदिर या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच संपन्न झाले असून, याप्रसंगी उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

याप्रसंगी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक नवनाथ भांगे आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष तथा विद्यमान संचालक नानासाहेब लोकरे कंदर विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन हरिभाऊ गरड कंदर सोसायटीचे संचालक विलास माने, जेष्ठ नागरिक संभाजी लोकरे ग्रामपंचायत सदस्य भीमराव इंगळे संभाजी राजे कुस्ती संकुलाचे उमेश इंगळे कौसर जहागिरदार संतोष सुरवसे आदी उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थ्यांनी आपला कलाविष्कार सादर करून उपस्थित रसिकांची मने जिंकत वाहवा मिळवली.. शाळेतिल मुलांच्या कलागुणांना वाव मिळेल या उद्देशाने वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. देश भक्ती गिताबरोबर लोकगीते भक्तीगिते कोळीगिते हिन्दी मराठी चित्रपटातील विविध गितावर आपली कला विद्यार्थ्यांनी सादर केली.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कण्वमुणी विद्यालयाचे मुख्याध्यापक बापू पवार यांचे सह शाळेतील सहशिक्षक तसेच शंकरराव भांगे मालक प्राथमिक विद्या मंदिर या शाळेच्या मुख्याध्यापिका रेश्मा उबाळे यांचे सह सहशिक्षिका आणि संस्था सचिव प्रा. सुनील भांगे यांनी विशेष परिश्रम घेतले.. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहिनी नवले आणि सुवर्णा गायकवाड यांनी केले. तर आभार संजय बल्लाळ यांनी मानले कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात गर्दी होती.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!