करमाळ्यात खत विक्रेत्यांचा कडकडीत बंद - तहसिलदारांना दिले निवेदन.. - Saptahik Sandesh

करमाळ्यात खत विक्रेत्यांचा कडकडीत बंद – तहसिलदारांना दिले निवेदन..

Fertilizer shop on strike in Karmala

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : करमाळा तालुक्यातील रासायनिक खत विक्रेते आणि कीटकनाशके बियाणे असोसिएशनच्यावतीने करमाळा तालुक्यातील 750 दुकाने बेमुदत संपावर गेली आहेत, यात खताच्या कंपन्याकडून होणारे अतिरिक्त लिंकिंग खते, खते कंपन्या पोच देत नाहीत, हमाल व मालवाहतूकदार यांच्या कडून होणारी अडवणूक या प्रश्नासाठी बेमुदत संप पुकारला आहे.

रासायनिक खत कंपन्या इतर अनुदानित खतासोबत जैविक खते व इतर प्रोडक्ट व्यापाऱ्यांच्या गळ्यात घालतात मात्र शेतकऱ्यांना ही खते विकता येत नाहीत यातून शेतकरी व विक्रेत्यात वाद होऊन तक्रारी वाढत आहेत, युरिया खताची अधिक उत्तम विक्री किंमत266 आहे मात्र व्यापाऱ्यांना अनेक वेळा हे खत वाहतूक करून आणावे लागते व्यापाऱ्यांना घरात या खताची पोते तीनशे रुपये पर्यंत येते पण 266 रुपयाला विकणे अशक्य होते.

26जानेवारी 2023 रोजी करमाळ्यात करण्यात अचानक हमाला नी काम बंद केल्यामुळे 300 मॅट्रिक टन खत परत गेले. कुर्डूवाडी पंढरपूर बारामती रेल्वे पॉईंटहून आलेल्या सर्व आलेले ट्रक रखडल्यामुळे नंतरचे खत आले नाही यामुळे आता करमाळातील बाजारातील उपलब्धता कमी होणार आहे.

सदर निवेदन देताना करमाळा खते विक्रेते बी बियाणे असोशनचे अध्यक्ष महेश चिवटे प्रशांत नेटके, राजकुमार जोशी, सोमनाथ शिंदे , शितल गांधी , महावीर सोळंकी, प्रविण कोढावळे, संतोष दोशी , आदीत्य दोशी , सुमित सरडे ,शैलेश गरड, कृष्णा सरडे , सुरेश सरडे , सचिन बिनवडे , सागर नाळे , गणेश सानप , विशाल जायभाय , राजेंद्र मेरगळ , विलास जाधव , वैभव वीर , सचिन सुरवसे , प्रताप जाधव , गणेश फुले , किरण गायकवाड , अभिजीत बदे , अक्षय घाडगे , जितेंद्र मिसाळ , नयन रोकडे, धनजंय राऊत , लक्ष्मण भोसले , विशाल मस्कर , गणेश नलवडे ,कांतीलाल कटारिया, प्रदीप देवी ,रोहित दोशी , धनंजय राऊत , प्रितम राठोड , सागर गायकवाड , सोनु होनमाने , वैभव मावलकर , लक्ष्मण भोसले , विशाल मस्कर , सागर बोराडे , प्रशांत केकान, नागेश चेंडगे , मिलिंद चव्हाण आदी उपस्थित होते.

चौकट

खत विक्रेत्यांच्या संदर्भात कामगार आयुक्त यांना पत्र व्यवहार केला असून लवकरच याबाबत कामगार आयुक्त वाहतूकदार हमाल व व्यापारी यांचे प्रश्न सोडतील. – समीर माने तहसीलदार करमाळा

करमाळ्यात पाठवलेल्या खताच्या गाड्या लवकर खाली होत नाहीत, त्या मुद्दाम रखडवल्या जातात, यामुळे आता करमाळ्याला खत पाठवायचे का नाही याचा विचार करावा लागेल, 26 जानेवारीला अचानक बंद झाल्यामुळे रासायनिक खत मिळाले नाही शेतीतल्या कामे रखडले गेली मजुरी वाया गेली याला जबाबदार कोण असा प्रश्न शेतकऱ्याचा विचारला जात आहे. – दत्ता काकडे, अध्यक्ष माल ट्रकवाहतूकदार संघ कुर्डूवाडी

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!