मा.आ.नारायण पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित नेत्र तपासणी शिबिरात 267 रुग्णांची तपासणी – 34 रूग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया

करमाळा/ संदेश प्रतिनिधी :
करमाळा : चिखलठाण (ता.करमाळा) येथील ग्रामपंचायतीच्यावतीने माजी आमदार नारायण पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित नेत्र तपासणी शिबिरात 267 रुग्णांची तपासणी करण्यात आली तर 34 रूग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच धनश्री गलांडे यांनी दिली आहे.

बुधराणि हॉस्पिटल पुणे व ग्रामपंचायत चिखलठाण यांच्या वतीने चिखलठाण येथे मोफत माजी आमदार नारायण पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते ते शिबिराचे उद्घाटन घेऊन ग्रामपंचायतचे सरपंच पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजित निबंध व विविध स्पर्धा मधील विजेत्यांना बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक चिखलठाण सोसायटीचे अध्यक्ष विकास गलांडे यांनी केले.या कार्यक्रमाला पंचायत समितीचे माजी उपसभापती दत्तात्रय सरडे, सरपंच धनश्री गलांडे, आदिनाथ चे माजी संचालक धुळाभाऊ कोकरे, संदीपान बारकुंड उपसरपंच योगेश सरडे, आबासाहेब मारकड, हेमंत बारकुंड , आनंद पोळ, संभाजी कांबळे, मनोहर गव्हाणे, पुष्पा चव्हाण, महादेव सरडे कुगावचे सरपंच महादेव पोरे, कैलास बोंद्रे, विजय कोकरे अविनाश सरडे, साहेबराव मारकड, सुरेश चव्हाण, फिरोज तांबोळी सतिश बनसोडे, बिभिषण कळसाईत यांच्यासह बुधराणी हॉस्पिटलचे डॉक्टर कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.




