नूतन माध्य. उच्च माध्य. विद्यालयाचा १२ वी विज्ञान शाखेचा १००% निकाल – मुलींनी मारली बाजी

केम (संजय जाधव) : केम (ता. करमाळा) येथील नूतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या इ.१२वी विज्ञान शाखेचा निकाल यंदाही १००% लागला आहे. या विद्यालयाने यशाची परंपरा कायम राखत यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे.
विद्यालयातील यशस्वी विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे :
विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण विद्यार्थी : १५
(यामध्ये ८०% व त्यापेक्षा अधिक गुण मिळवलेले विद्यार्थी : ५)
प्रथम श्रेणीतील विद्यार्थी : ९५
द्वितीय श्रेणीतील विद्यार्थी : ४१
प्रथम क्रमांकाचे विद्यार्थी :
1. काळे मानसी परसराम — ८६.३३%
2. ओहोळ सत्यपाली महेश्वर — ८३.५०%
3. रेडे श्रेया सुदाम — ८३.१७%
4. सलगर पियुषकुमार सज्जन — ८१.१७%
5. तळेकर वैष्णवी विजयकांत — ८०.००%
विषयानुसार सर्वाधिक गुण मिळवलेले विद्यार्थी :
Crop Science : कु. ओहोळ सत्यपाली महेश्वर — १९४/२००
Mathematics : कु. लोंढे पूर्वा मनोज — ९७/१००
Chemistry : कु. काळे मानसी परसराम — ८८/१००
Physics : कु. ओहोळ सत्यपाली महेश्वर, रेडे श्रेया सुदाम, काळे मानसी परसराम — प्रत्येकी ७३/१००
Biology : कु. भोसले दिया बाळासाहेब, काळे मानसी परसराम — प्रत्येकी ८८/१००
Crop Production : कु. पालवे कोमल नामदेव — ९५/१००
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे चेअरमन श्री. सुदर्शन तळेकर, सचिव भाऊसाहेब बिचितकर, मुख्याध्यापिका ताकमोगे मॅडम तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे .या प्रशालेने निकालाची परंपरा जपत यंदाही शतप्रतिशत यश संपादन केल्याबद्दल परिसरात विद्यालयाचे विशेष कौतुक होत आहे.






